कुडाळ (प्रतिनिधी) :
शिवसेना कुडाळ कार्यालय येथे तालुकाप्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर, पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या वतीने भावी खासदार किरण उर्फ भैय्या सामंत यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीनेही जोरदार स्वागत करण्यात आले. भविष्यात खासदारकीचे तिकीट भैय्या सामंत यांनाच मिळूदे अशी नेरूर येथील कलेश्वर मंदिरात जाऊन कलेश्वर चरणी प्रार्थना ही करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हासंघटक रुपेश पावसकर, खजिनदार भास्कर राणे, अरविंद करलकर, संजय भोगटे, यशवर्धन राणे, प्रसाद नार्वेकर, आदित्य राणे, राजेश तेंडोलकर, रत्नाकर जोशी, पंढरीनाथ मेस्त्री, बाबी शिंदे, रामकृष्ण गडकरी, दाजिबा कुबल (मालवण), शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोशात हजर होते. यावेळी सर्वांनी भैयांना एकहाती निवडून देण्याचा निर्धार केला.