You are currently viewing आ. वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या ६ कोटी १० लाखाच्या चिंदर तेरई जोड रस्त्याचे केले भूमिपूजन

आ. वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या ६ कोटी १० लाखाच्या चिंदर तेरई जोड रस्त्याचे केले भूमिपूजन

*चिंदर गावडेवाडी येथील सभामंडपाचे व बाजारपेठ साईमंदिर येथील सभामंडपाचेही भूमिपूजन; प्रत्येकी १० लाख रु मंजूर*

मालवण :

आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चिंदर तेरई जोड रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी ६ कोटी १० लाख रु., चिंदर गावडेवाडी हनुमान मंदिर येथे सभामंडप बांधणे या कामासाठी १० लाख रु. ,चिंदर बाजारपेठ साईमंदिर येथे सभामंडप बांधणे या कामासाठी १० लाख रु., चिंदर गावडेवाडी येथे स्ट्रीटलाईट बसविण्यासाठी १ लाख रु. मंजूर केले असून या कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. चिंदर ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन विकास कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले.

 

यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख उदय दुखंडे, उप शहरप्रमुख सन्मेष परब,अवधूत मालणकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे,विभाग संघटक मंगेश टेमकर, समीर हडकर, विनायक परब, करण खडपे,वायंगणी सरपंच रूपेश पाटकर,उप सरपंच ऍड. आस्वलकर , विभाग संघटक पपू परुळेकर,उपविभाग प्रमुख अनिल गावकर, माजी सरपंच सौ भाग्यश्री घागरे, ग्रामपंचायत सदस्य रिया घागरे, मिथुन माळगावकर, दत्ता घागरे, सुभाष सावंत,अमित घागरे,विलास घागरे, उत्तम घागरे, निखिल माळकर,विनोद केळसकर, जगन्नाथ घागरे,शाली घागरे, मिलिंद चिंदरकर, संजय हडपी, वायंगणी माजी सरपंच सौ.संजना रेडकर,निशांत पारकर, प्रकाश वराडकर, प्रसाद टोपले, दिणकर टोपले, विद्याधर मुणगेकर,चारुशीला आचरेकर,महेश पांचाळ,ममता पांचाळ आदींसह शिवसैनिक व चिंदर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा