You are currently viewing 2024 ची भीती कशाला? – आशिष शेलार यांचा संजय राऊत यांना सवाल..

2024 ची भीती कशाला? – आशिष शेलार यांचा संजय राऊत यांना सवाल..

अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेनं भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. शेकडो कारसेवकांनी आपलं रक्त सांडून बलिदान दिलं. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केल्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

 

तर शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्यावरही भाजप आमदार आशिष शेलार यांनी टीकेची तोफ डागली आहे. ‘संजय राऊत यांची ही पोटदुखी असून राममंदिराच्या कामात पाय अडकवण्याचा प्रयत्न आहे. ई भूमिपूजनाला देखील त्यांनी असाच अडथळा आणला होता,’ असा आरोप शेलार यांनी करत संजय राऊत यांना 2024 ची भीती कशाला? असा सवाल देखील केला आहे.

 

‘श्रीरामाचं भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधलं जात आहे. 4 लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्तानं संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024चा निवडणूक प्रचार आहे. रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा’ असा सणसणीत टोला हाणला आहे. दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून राम मंदिराच्या मुद्यावरून सेनेनं भाजपला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

 

आशिष शेलार यांनी त्यावर ट्वीट करून शिवसेनेला प्रत्युत्तर केले आहे. ते म्हणाले, विषय हा क्रेडिटचा नाही तर विषय मेट्रोचा, कोस्टल रोडचा किंवा बुलेट ट्रेनचा आहे. प्रश्न मुंबईकरांचे, आम्ही ते विचारतो आणि विचारणारच! म्हणून राग येणाऱ्यांना समर्थांचा हा उपदेश… नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु॥, आशिष शेलार यांनी शिवसेनेला ऐकवला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा