जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असे उद्गार आपणास ऐकायला मिळतात आणि ते तंतोतंत खरेही आहे. आजच्या काळात आज आपण महिला दिन साजरा करीत आहोत खरोखरच हा महिलांचा सन्मान आहे खरं म्हणजे महिलाही कुटुंब व्यवस्थेची मध्यवर्ती आहे. या समाजातून महिलांना वजा केले तर शून्य उरणार आहे एवढे उपकार महिलांनी या समाजावर करून ठेवलेले आहेत स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ह्या कवीच्या ओळी तंतोतंत खरे आहेत म्हणून आपण स्त्री शक्तीचा सदैव आदर केला पाहिजे आपल्या जीवनाची सुरुवात होते की आईपासूनच आपला जन्म होईल तर तो आईमुळेच आणि आपले संगोपन होईल ते आपल्या आईमुळेच आणि म्हणूनच आईला एका कवी ने परमेश्वरापेक्षाही उंच केले आहे तो म्हणतो हे माँ तेरी सुरत से अलग भगवान की सुरत क्या होगी . पर जिसको देखा ना हमने कभी उसकी जरूरत क्या होगी या ओळी मध्ये आई जर असली तर मग परमेश्वराची देखील गरज नाही असे वर्णन करून कवीने स्त्री जातीचा महिमा गायलेला आहे आणि तो तंतोतंत खरा आहे.स्त्री शिवाय घराला घरपण येत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपण राष्ट्रमाता जिजाऊ चे उदाहरण घेऊया.राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जे संस्कार केले आणि ज्या स्वराज्याचे बाळकडू त्यांना लहानपणी पाजले त्यामुळे आज शिवरायांचे नाव संपूर्ण जगामध्ये आज आदराने घेतले जाते. मुलांवर संस्कार करण्याची फार मोठी कामगिरी स्त्रिया पार पाडत असतात अनेक राज्यांमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे मी या ठिकाणी एक सूचना करेल.प्रत्येक घराच्या पाटी वर घरातील कर्त्या पुरुषाचे नाव असते पण त्या घरात जर स्त्री नसेल तर ते घर अपूर्ण वाटते त्या घराला घरपण येत नाही माझी अशी सूचना आहे की प्रत्येक घराच्या पाठीवर नवऱ्याबरोबर बायकोचे पण नाव असले पाहिजे स्त्रीला अर्धांगिनी म्हटल्या जाते आणि ते खरेही आहे उलट स्त्री ही घरातील अर्ध्यापेक्षा जास्त भार उचलते पुरुष हा प्रामुख्याने नोकरीवर जाऊन पैसे आणण्याचे काम करतो परंतु स्त्री ही घराला घरपण देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करते म्हणून स्त्रियांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि आपण ते मान्य केले पाहिजे आजच्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमांमध्ये आपण महिलांचा सन्मान करणे शिकले पाहिजे अनेक घरांमध्ये महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते काही ग्रामीण भागामध्ये नेतृत्व पुरुषवर्ग करतात स्त्रियांना मानसन्मान देत नाही किंवा त्यांना मूळ प्रवाहात घेत नाहीत या उलट आजच्या सुशिक्षित जगामध्ये महिलांना मानाचे स्थान प्राप्त झालेले आहेत आणि स्त्रियांनी आपल्या कर्तुत्वाने आपले मोठेपण सिद्ध करून दाखवलेले आहे आपल्या भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी श्रीमती किरण बेदी यांची नावे आपल्याला उदाहरण दाखल घेता येतील.भारताच्या स्वातंत्र्यसंग्राम इतिहासाचा विचार केला तर त्यामध्ये देखील अनेक महिलांनी मोलाचे योगदान दिलेले आहे आणि म्हणूनच आपण महिलांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमांमध्ये मग ते लग्न असो वास्तुपूजन असो सामाजिक कार्य असो स्त्रियांना त्यांचा मानसन्मान दिला पाहिजे. ==============
प्रा. डॉ नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन IAS,
अमरावती