काजू चोरल्याच्या गैरसमजातून युवकाला बेदम मारहाण ; माडखोल येथील प्रकार
सावंतवाडी
काजू बागायतीत चोरी केल्याच्या गैरसमजातून एकाला घरात घुसून बेदम मारहाण केली. यात त्याचा पाय पूर्णतः निकामी झाला आहे. येथे घडली. विजय राऊळ ( ४६, रा. माडखोल-डुंगेवाडी ) असे जखमीचे नाव आहे. सदरची घटना मंगळवारी सायंकाळी उशिरा घडली.
या घटनेनंतर स्थानिकांनी जखमीला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, पोलीस हवालदार हनुमंत यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजय राऊळ हा आपल्या घरात सायंकाळी झोपलेला असताना बाहेरून आलेल्या संबंधित व्यक्तीने माझ्या बागेतील काजू का चोरले अशी विचारणा करत त्याला लाकडी रिपीच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली.
या मारहाणीमुळे तो त्याच ठिकाणी बेशुद्ध पडला. काही वेळानंतर घरी आलेल्या त्याच्या मुलीला आपले वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसल्याने तिने त्यांनी शेजाऱ्यांना त्याची कल्पना दिली.
यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संबंधितावर खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. उशिरा पर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
WhatsAppFacebookTwitterTelegramShare