*आजगाव हायस्कूल माजी विद्यार्थी संघाचा उपक्रम*
आजगाव:
आजगाव येथे विनय सौदागर यांच्या माध्यमातून अनेक साहित्यिक, मुलांसाठी शालोपयोगी असे उपक्रम राबविण्यात येतात. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ देखील मासिक एक उपक्रम व मुलांना बक्षिसे देखील दिली जातात. असाच एक नवा उपक्रम आजगाव येथे राबविला गेला तो म्हणजे साने गुरुजींची १२५ वी जयंती.
पूजनीय साने गुरुजींचे हे १२५ वे जन्मवर्ष आहे. त्याप्रीत्यर्थ आजगाव हायस्कूलच्या आठवीच्या २० मुलाना ‘श्यामची आई’ हे पुस्तक भेट देण्यात आले. त्याचबरोबर हे पुस्तक भेट देतानाच त्याचा हेतू देखील व्यापक असा ठेवला. मुले हे पुस्तक फक्त वाचणार नाहीत तर वाचून त्याचे परीक्षण लिहितील. म्हणजेच त्यांचा वाचनातून कल लक्षात येईल, मुलांना त्यातून काय धडा मिळाला हे ज्ञात होईल. उत्कृष्ट तीन परीक्षणांना अनुक्रमे ₹१००, ₹७५ व ₹५० अशी रोख बक्षीसे देण्यात येतील. ही सर्व पुस्तके व बक्षीसे यासाठी येणारा खर्च आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ विनय सौदागर कुटुंबियांकडून करणेत आला. (वडीलांच्या जन्म शताब्दीनिमित्त या वर्षी दर महिन्याला एक उपक्रम राबविण्यात येतो.)
यावेळी दिलीप पांढरे, एकनाथ शेटकर, विनय सौदागर उपस्थित होते. आजगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.भागीत सर यांचे याकामी मोलाचे सहकार्य लाभले अशी माहिती साहित्यिक विनय सौदागर, आजगाव, सावंतवाडी यांनी दिली.
विनय सौदागर संपर्क क्र.9403088802