You are currently viewing नांदगाव च्या विकासासाठी निस्वार्थपणे काम करत राहणार ;आमदार नितेश राणे

नांदगाव च्या विकासासाठी निस्वार्थपणे काम करत राहणार ;आमदार नितेश राणे

*नांदगाव च्या विकासासाठी निस्वार्थपणे काम करत राहणार ;आमदार नितेश राणे

*नांदगाव नमो चषक शुटींग बॉल स्पर्धेत मनेराजुरी संघ विजेता,

*देशपातळीवरील स्पर्धकांनी गाजविले नांदगावचे मैदान

कणकवली;
नांदगाव आणि राणे कुटुंब यांचे एक दृढ नाते आहे. ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्यापासून चालत आलेली ही नात्याची परंपरा मी पुढेही चालू ठेवत आलो आहे. राजकारण आणि समाजकारणात काम करत असताना नांदगाव गावाचा विकास,येथील प्रत्येक व्यक्तीचा विकास निस्वार्थपणे करत राहीन. आमदार, लोकप्रतिनिधी यापलीकडे जाऊन तुमच्या कुटुंबातला एक सदस्य या नात्याने मी तुमच्यासोबत कायम उभा असेन. प्रत्येक प्रसंगात मी तुमच्या सोबत असेन असे भावोद्गार भाजप आमदार नितेश राणे यांनी काढले.नमो चषक २०२४, च्या इरफान फ्रेंड सर्कल व दोस्ताना ग्रुप नांदगाव आयोजित अखिल भारतीय निमंत्रित शुटींग बॉल स्पर्धेत ते बोलत होते.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,उपसरपंच इरफान साठविलकर , हुसेन लांजेकर, पंढरी वायंगणकर ,हर्षदा वाळके,बाबा आंबर्डेकर,रमिजान बटवाले, जैबा नावलेकर, रज्जाक बटवाले, कमलेश पाटील, अफ्रोजा नावलेकर ,सद्दाम कुंणकेरकर ,सलीम बोबडे,शाहिद बटवाले, शकील बटवाले,यासिन बटवाले,यासिन पाटणकर, इलाई साठविलकर, यासिन नावलेकर, संतोष बिड्ये ,आबा बिडये, राजु तांबे ,जाधव गुरुजी, यासिर मस्के,इरफान फ्रेंड सर्कल चे सर्व सभासद दोस्ताना ग्रुपचे सर्व सभासद नांदगाव भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
मनेराजुरी संघ विजेता ठरला तर आयएससी मालेगाव संघ उप विजेता ठरला.या स्पर्धेत टेंबुर्गी, पंजाब, अमिरकाशी, क्रांती कुंडल,सांगली,इस्तेयाक मालेगाव.अशा मातब्बर संघाने सहभाग घेतला होता.उत्कृष्ट नेटमन – श्री अक्षय पवार (मनेराजुरी),उत्कृष्ट शुटर – श्री. जाहीद अन्सारी (मालेगोव),उत्कृष्ट लिप्टर – श्री. बीजी (पंजाब) यांना गौरविण्यात आले..

प्रतिक्रिया व्यक्त करा