You are currently viewing वायगंतड येथे अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू..

वायगंतड येथे अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू..

वायगंतड येथे अपघात ; दुचाकीस्वाराचा मृत्यू..

दोडामार्ग

दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मार्गावर वायंगणतड नजीक रविवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास सुसाट मोटार सायकल ओव्हरटेक करताना कारच्या दरवाज्याला धडकून मोटार सायकल खाली पडून दोघे जखमी झाले. जखमींना कारचालकांने कार मधून साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे दाखल केले असता एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाला. सुमीत परशुराम पाटील वय वर्षे २७ कालकुद्री चंदगड हा मयत झाला. हा अपघात रविवारी रात्री आठ च्या सुमारास झाला.

म्हापसा गोवा येथील काही जण कोल्हापूर येथून देवदर्शन घेऊन पुन्हा गोवा येथे जाण्यासाठी बेळगाव दोडामार्ग गोवा असा प्रवास डस्टर कार घेऊन गोवा येथे जात होते तर चंदगड कालकुद्री येथील दोघे युवक मोटार सायकल घेऊन गोवा येथे निघाले होते. वायंगणतड या ठिकाणी कार पुढे जात असताना कारला ओव्हरटेक करून पुढे जात असताना कारच्या दरवाज्याला मोटार सायकल धडकून मोटार सायकल रस्ता कडेला जाऊन धडकून यात सुमीत परशुराम पाटील हा उसळला जाऊन बाजूला दगडाला आपटला. तर औंकार विठ्ठल पाटील हा बाजूला पडला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावले गोवा येथील कार चालकाने आतील इतरांनी आपल्या डस्टर कार मधून साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे दाखल केले.

चंदगड येथील मयताचे नातेवाईक यांना अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे यायला निघाले. पण पोलिसांनी कार चालक इतरांना पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. म्हापसा गोवा येथील कुटुंब यांनी माणूसकी दाखवून आरोग्य केंद्र येथे दाखल केले. पण त्याच्या निधनाचा धक्का बसला. जखमी झाला असता खर्च करण्याची तयारी दाखवली होती. दरम्यान दोडामार्ग पोलिस ठाण्यात अपघात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आरोग्य केंद्र येथे पोलिस निरीक्षक निसर्ग ओकारी तसेच पोलिस संजय गवस, वसंत देसाई, होमगार्ड बाळकृष्ण जाधव, आरोग्य केंद्र येथे पंचनामा केला नातेवाईक यांनी एकच आक्रोश सुरू केला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा