You are currently viewing सावंतवाडीत निसर्गोपचार चिकित्सा सेंटर जीवन रक्षा हॉस्पिटलमध्ये सुरू नाविन्यपूर्ण उपक्रम

सावंतवाडीत निसर्गोपचार चिकित्सा सेंटर जीवन रक्षा हॉस्पिटलमध्ये सुरू नाविन्यपूर्ण उपक्रम

सावंतवाडी

सावंतवाडी येथील जीवन रक्षा हॉस्पिटल आणि एक्यू नेचर क्वेअर पर्वरी गोवा संचलित संयुक्त विद्यमाने निसर्गोपचार चिकित्सा केंद्र सुरु करण्यात आले आहे या केंद्राचा शुभारंभ जीवन रक्षा हॉस्पिटल चे मालक डॉक्टर शंकर सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार एडवोकेट संतोष सावंत देशभक्त शंकरावर गव्हाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस सिंधू सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीणकुमार ठाकरे डॉक्टर शर्वरी सावंत योग तज्ञ शिवाजी दळवी योग प्रशिक्षक उमेश गावडे पंचगव्य सुदत्त ठाकूर डॉक्टर अजित मटकर सौ दळवी आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर शंकर सावंत म्हणाले निसर्गोपचार चिकित्सा केंद्र हे येथे सुरू झाले आहे ही बाब स्तुत्य आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एडवोकेट सावंत म्हणाले शिवाजी दळवी हे योग्य अभ्यास आहेत त्यांची टीमही योगामध्ये पदवी घेतलेली आहे निसर्ग हाच तुमचा डॉक्टर आहे योगा पंचगव्य याचा अधिकाधिक लाभ घ्या यावेळी प्रा यशवंत गव स म्हणाले सावंतवाडी निसर्ग उपचार चिकित्सा पद्धत सुरू झाली आहे हे केंद्रा निश्चितच एक चांगली उंची गाठेल डॉक्टर ठाकरे यांनी आयुर्वेदिक थेरपी योगा अभ्यास आज अत्यंत गरजेचे आहे आणि हे केंद्र निश्चितच येथील नागरिकांना चांगली सेवा देईल यावेळी योगाभ्यास तज्ञ शिवाजी दळवी यांनी यांनी स्पष्ट केले लखवा डायबिटीस ब्लड प्रेशर पोटाचे विकार सांध्यांचे दुखणे स्त्रियांचे आजार थायरॉईड कॅन्सर गाठी यूरिक ॲसिड कोलेस्ट्रॉल लठ्ठपणा मणक्यांचे विकार यावर उपचार चिकित्सा पद्धत व ॲक्युप्रेशर ही सिंधुदुर्गात प्रथमच सुरू करण्यात येत आहे पाच जिल्ह्यात अशी सुविधा अन्य कोठे नाही या सुविधेचा लाभ घ्या असे आवाहन त्यांनी केले निसर्ग हा तुमचा डॉक्टर आहे आहार हेच तुमचे औषध आहे असे ते म्हणाले यावेळी प्रास्ताविक डॉक्टर अजित मटकर यांनी केले यावेळी योगा उपचार पद्धती ची माहिती देण्यात आली

प्रतिक्रिया व्यक्त करा