You are currently viewing ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.प्रतिभाताई पिटके लिखित व्यक्तीविषेश लेख

ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.प्रतिभाताई पिटके लिखित व्यक्तीविषेश लेख

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.प्रतिभाताई पिटके लिखित व्यक्तीविषेश लेख*

*प्राचार्य डॉ उदय नावलेकर*:
*शिक्षणक्षेत्रातील तारा*

*भाग २*
तल्लख बुद्धिमत्ता व कष्ट करण्याची मानसिक तयारी असलेले डॉ उदय ज्या कामाला हात घालतील ते काम यशस्वी होणारच! सर्वगुणसंपन्नता हा त्यांचा विशेष गुण. त्यांच्या लहानपणापासूनच त्यांची धडाडी लक्षणीय आहे.

विद्यार्थी दशेत असतांना यवतमाळ ते काश्मीर हा प्रवास सायकलने करणारे उदयजींनी पुढे अमेरिका, कॅनडा, थायलंड, हाँगकाँग, दुबई अशा अनेक देशांचा अभ्यास दौरा केला. नुकतेच जर्मनीत मुलीला भेटायला गेल्यावर त्यांनी एडॉल्फ हिटलरच्या जीवनाचा सखोल अभ्यास केला. म्युझियमला भेटी देऊन त्यांनी एक डॉक्युमेंटरीं फिल्म तयार केली . चांगल्या डॉक्युमेंटरी फिल्म बनविण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. मोनालिसा, लता मंगेशकर ,ईलॉन मस्क यांच्यावर त्यांनी बनविलेल्या फिल्म आपण “उदय नावलेकर “ ह्या यूट्यूब चॅनेलवर जरूर पहाव्यात म्हणजे त्यांच्या कल्पक बुद्धीची आणि अभ्यासाची आपल्याला कल्पना येईल अशी खात्री आहे. रोटरी इंटरनॅशनलचा अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार मिळविणारे विदर्भातील ते पहिले व्यक्ती आहेत. त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.एखाद्या इंग्रजी किंवा मराठी वृत्तपत्राचा यशस्वी संपादक होण्याची क्षमता त्यांच्याकडे नक्कीच आहे.

प्राचार्यपदाची धुरा हाती घेतल्यावर त्यांच्या कार्याला अधिकच झळाळी मिळाली व्यवस्थापन , प्राध्यापक, विद्यार्थी ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ इत्यादी सगळ्यावर त्यांचे बारीक लक्ष असते. प्रत्येक घटक आनंदी असावा, कार्यकुशल असावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. सरांच्या प्रेमळ व आश्वासनात्मक वागणुकीमुळे प्रत्येक जण त्यांच्यावर प्रेम करतो. आपल्या कामात दक्षता ठेवतो.
प्रतिष्ठित अशा रुईकर ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत.ट्रस्टद्वारा निर्मित संस्थेची दैदिप्यमान प्रगति हे सरांच्या अथक प्रयत्नांचे फलित होय . यवतमाळला उजव्या सोंडेच्या गणपतीचे फार जुने जागृत मंदिर आहे. या मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. मंदिराचे स्वरूप पूर्णतः पालटले.श्रद्धाळूंची गर्दी वाढली याचे श्रेय सरांना आहे. अध्यात्म व विज्ञान ह्यांची अतिशय उत्तम सांगड हे त्यांच्या जीवनाचे आणखी एक वैशिष्ट्य!

सेवेचा एक भाग म्हणून त्यांनी डोळ्यांचा दवाखाना व फिजिओथेरपी सेंटर सुरू केले . दर चतुर्थीला तेथे मोफत चष्मे वाटप केले जाते.अनेक
वैद्यकीय शिबीरे घेतली जातात. सेवाधर्म हा सरांच्या रक्तात भिनलेला आणखी एक गुण! चंदनाने कितीही ठरविले तरी त्याचा सुगंध त्याला झाकता येईल का? आज सर्व स्तरात त्यांच्याविषयी जे आदर, प्रेम आहे ते त्यांना सुखासुखी थोडे मिळाले ? त्यासाठी त्यांची अविश्रांत मेहनत , परोपकाराची भावनाच कारणीभूत आहे.

नावलेकरांबद्दल जाणून घेतांना किती घेशील दो कराने अशी माझी स्थिती झाली आहे . त्यांच्याविषयी जाणून घेतांना ,व्यक्त होतांना ईश्वराचीच इच्छा ह्याची खात्री आहे अन्यथा त्यांचा जीवनपट उलगडणे हे माझ्यासारख्या येरागबाळ्याचे काम नाही.

प्राचार्य नावलेकरांनी नांझा येथे एक सुंदर सुसज्ज अशी शाळा उभारली आहे. तेथील फळबाग अतिशय रेखीव आहे. अतिशय दुर्गम भागात असलेल्या या शाळेत समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. गेल्या २० वर्षात ओपन कॅटेगरीच्या एकाही विद्यार्थ्याचा या शाळेत प्रवेश झाला नाही. ह्या शाळेत ३००० स्क्वेअर फूटचे ॲाडीटेरीअम, बास्केटबॉल कोर्ट, कम्प्युटर व लँग्वेज लॅब, आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून १८००० पुस्तके असणारे सुंदर ग्रंथालय आहे .रुईकर ट्रस्ट संचालित या शाळेच्या घवघवीत यशाच्या मागे डॉ नावलेकरांची प्रचंड इच्छाशक्ती, शिक्षणाचा प्रसार व्हावा ,प्रत्येकाला शिक्षण मिळावे ही त्यांची आंतरिक तळमळ हेच खरे कारण आहे .

स्वतः नावलेकर उत्कृष्ट खेळाडू आहेत. भालाफेक व क्रिकेट वर त्यांचे विशेष प्रेम! प्रत्यक्ष जीवनात, कार्य करताना चुकीच्या विचारांना मार्गदर्शन करताना अचूक वेध कसा घ्यावा हे त्यांना छान अवगत आहे. तसेच बोलतांना समोरच्या व्यक्तीला क्लीन बोल्ड करण्याची हातोटी त्यांच्याजवळ आहे.

अतिशय समाधानी आनंदी स्वभावाचे डॉ उदयजी नावलेकरांविषयी जाणून घेण्याचा मी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न, वाचकांना आवडेल अशी आशा आहे .प्रत्यक्ष भेटीची उत्सूकता आहेच . डॉ नावलेकरांना आयुष्यात अधिकाधिक यश मिळो. दशदिशात त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध दरवळत राहो ही सदिच्छा!
समाप्त.
लेखन:प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा