26 जानेवारीपासून चार चाकी वाहनांना मुंबईत फास्ट टॅग अनिवार्य असणार आहे. मुंबईतील 5 पैकी 4 टोलनाक्यांवर सेंसर लावण्याचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत विना फास्ट टॅग गाडीला टोला नाका क्रॉस करता येणार नाही.
चारचाकी वाहनांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नोव्हेंबर महिन्यात एक मोठा निर्णय घेतला. 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आला आहे. संपूर्ण देशातील टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंट सिस्टिमला चालना देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. आता मुंबईतही 26 जानेवारीपासून विना फास्ट टॅग गाडी टोल नाका पार करु शकणार नाही.
मुंबईतील दहिसर टोलनाका सोडता अन्य चार ठिकाणच्या टोल नाक्यावरील सेंसर तसंच इतर तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. येत्या 26 जानेवारीपासून अनिवार्य फास्ट टॅगचा नियम लागू करण्यासंबंधी सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
एमएसआरडीसीचे जॉइंट एमडी विजय वाघमारे यांनी सांगितलं की, “दहिसर टोल नाका वगळता अन्य चार टोल नाक्यावरील काम पूर्ण झालं आहे. 26 जानेवारीपासून हा नियम लागू करण्याचा प्रस्ताव आम्ही सरकारला पाठविला आहे”.दहिसर टोलनाक्याजवळूनच मेट्रो जात असल्याकारणाने टोल नाक्यासंबंधी बदल होणे अपेक्षित आहे. विजय वाघमारे म्हणाले, “फास्ट टॅग सेंसर लावण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. त्यामुळे दहिसर मेट्रो प्रस्तावित मार्ग असल्याने त्याठिकाणी सेंसर लावले नाहीत”.
मुंबई पुणे एक्स्पप्रेस हायवे आणि वांद्रे वरळी सी लिंक रोडवर फास्ट टॅग लावले गेले आहेत. सध्या विना फास्ट टॅगसाठी काही लाईन चालू आहेत मात्र त्या काही दिवसांसाठीच चालू असतील. मुंबईतील मुलुंड, ऐरोली, दहिसर, वाशी एलबीएस मार्ग, वांद्रे वरळी सी लिंक तसंच मुंबई पुणे एक्सप्रेसवेसह अन्य रोडवरील टोल वलूली करण्याचा अधिकार एमएसआरडीसीजवळ आहे. नॅशनल हायवेवरील टोल वसुली करण्याचा अधिकार एनएचएआयकडे आहे.
देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील 536 पेक्षा जास्त टोल नाक्यांवर हे FASTag स्विकारलं जाईल. या टोल नाक्यावर फास्टॅग लेन बनवण्यात आले आहे. हे लेन 500 मीटर दूरुनच नजरेस पडते. FASTag च्या माध्यमातून कशाप्रकारे टोल भरावा हे तुम्ही टोल बूथवरील कर्मचाऱ्यालाही विचारु शकता.
*अधिक माहितीसाठी* https://www.npci.org.in/sites/all/themes/npcl/images/PDF/Plaza%20Master-31-08-2019%20-%20PDF.pdf या लिंकवर क्लिक करा. या संकेतस्थळी तुम्हाला सर्व टोल नाक्यांची माहिती मिळेल.