You are currently viewing वीज ग्राहक संघटना सावंतवाडीची विभागीय बैठक ग्रामपंचायत भालावल येथे

वीज ग्राहक संघटना सावंतवाडीची विभागीय बैठक ग्रामपंचायत भालावल येथे

*सोमवारी ४ मार्च रोजी ग्रामपंचायत भालावलने केले बैठकीचे नियोजन*

 

सावंतवाडी ;  तालुक्यातील भालावल पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी १५ मार्च पासून महावितरणच्या विरोधात उपोषण करण्याचे निवेदन उपकार्यकारी अभियंता यांना दिले आहे. त्या अनुषंगाने भालावल पंचक्रोशीतील वीज ग्राहकांच्या असलेल्या समस्या जाणून घेऊन वीज ग्राहकांशी चर्चा करण्यासाठी भालावल ग्रामपंचायतने वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत सोमवार दिनांक ४ मार्च रोजी सायंकाळी ४.०० वाजता बैठकीचे आयोजन केले असून सदरची बैठक भालावल ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडणार आहे. यावेळी वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड व इतर पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहणार आहेत.

भालावल येथील कांगलीचे भरड येथे बसविलेला ट्रान्सफॉर्मर हा वादाचा विषय असून शेतकऱ्यांना सदरचा ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर देखील कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात आणि शेती पंप चालत नसल्याने गावातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला शेतीचे देखील नुकसान होत आहे. अशा अनेक प्रश्नांवर सदरच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असून सदर बैठकीला पंचक्रोशीतील ओटवणे, असनिये, तांबोळी, घारपी , सरमळे, कोनशी, विलवडे, वाफोली आदी गावांतील वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना सावंतवाडी व ग्रामपंचायत भालावल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा