You are currently viewing ३१ डिसेंबरपूर्वी नोंदणी केल्यास पुढील चार महिने मुद्रांक सवलत

३१ डिसेंबरपूर्वी नोंदणी केल्यास पुढील चार महिने मुद्रांक सवलत

मुंबई

राज्य सरकारने ३१ डिसेंबपर्यंत मुद्रांक शुल्कात तीन टक्के  सूट दिली आहे.त्यानुसार ३१ डिसेंबरपूर्वी केव्हाही मालमत्तेची नोंदणी करून मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांत प्रत्यक्ष दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.मुद्रांक शुल्कात सवलत असल्याने सदनिका खरेदी-विक्रीमध्ये वाढ झाली असून येत्या दोन आठवडय़ांत दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे.याबाबतचे आदेश राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी दिले आहेत.

दस्त नोंदणीचे प्रमाण वाढल्याने सुटीच्या दिवशी देखील दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.२६ डिसेंबर रोजी शनिवार, तर २५ डिसेंबरला नाताळची सुटी आहे.मात्र,या दिवशी देखील दस्त नोंदणी कार्यालये सुरू राहणार आहेत.याबरोबरच पुणे, मुंबई आणि ठाणे या तिन्ही जिल्ह्य़ांमध्ये दस्त नोंदणीच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत.त्यानुसार या ठिकाणची दस्त नोंदणी कार्यालये सकाळी ७.३० ते रात्री ८.४५ पर्यंत दोन सत्रांत सुरू ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान,अधिक माहिती देताना नोंदणी महानिरीक्षक देशमुख म्हणाले,‘मुद्रांक शुल्क कमी करण्यात आल्याने दस्त नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. मुद्रांक शुल्क भरल्यानंतर संबंधितांना पुढील चार महिन्यांत दस्त नोंदणी करता येणार आहे.या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.आतापर्यंत शहरी भागात दस्त नोंदणी करताना पाच टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्के नागरी कर असे सहा टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा