महाशिवरात्रोत्सवानिमित्त कलंबिस्त येथे नाट्यमहोत्सव
सावंतवाडी
कलंबिस्त श्री देवी लिंगेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे. चार ते नऊ मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री नाट्यमहोत्सव २०२४ आयोजित करण्यात आला आहे. ४ मार्चला सायंकाळी सात वाजता मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा ‘शाकांबरी महिमा’ नाट्यप्रयोग होणार आहे. याचवेळी महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. ५ मार्चला भूमिका दशावतार नाट्यमंडळ मळगाव यांचे ‘बाळूमामा’ हे ट्रिकसीनयुक्त नाटक, ६ मार्चला श्री देवी माऊली दशावतार नाट्यमंडळ इन्सुली यांचे ‘शिवभरता गजसंग्राम’, ७ मार्चला स्थापेश्वर दशावतार नाट्यमंडळ डेगवे यांचे नंदीअस्त्र, आठ मार्चला महाशिवरात्र उत्सवादिनी संयुक्त दशाव दशावतार नाट्यमंडळ यांचे ‘शापित राजनंदिनी’, नऊ मार्चला वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे अघोर लक्ष्मी, १० मार्च रोजी सकाळी दहा वाजता तीर्थस्थान व दुपारी एक वाजता महाप्रसाद होणार आहे. कलंबिस्त मानकरी, ग्रामस्थ व हनुमान दशावतार नाट्यमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.