*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय अध्यक्ष लेखक कवी पांडुरंगजी कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*=== आजचे आत्मचिंतन ====*
*बाळासारखं निरागसपणे आपणास का बरे हसता येत नाही?*
*हास्य क्लब लावूनही , खरे हसू का येत नाही ?*
*सर्व विकत मिळते पैशाने, पण सुख का मिळत नाही?*
*असे नानाविध प्रश्न आपणास नेहमीच भंडाऊन सोडत असतात.*
*याची उत्तरे कुठे मिळतील?*
*चला यावरच आपण थोडेसे आज चिंतन, मनन करू यात. कदाचित काही प्रमाणात का होईना, उत्तरे मिळु शकतील. प्रयत्न तरी करू यात….*
*स्व ची ओळख झाली की आनंद मिळेल. कारण स्व हा आत्मा आहे जो आनंदस्वरूप आहे. सत चित आनंद आहे.*
*आपण जीव या भावनेने स्वतः कडे पाहतो. जीव मात्र विषय विकारांनी प्रदूषित असतो. त्यामुळे सुख, समाधान, आनंद मिळत नाही. आणि हास्य हे तर सुख, समाधान, आनंद व्यक्त होण्याचे परिमाण आहे.*
*निरागसता हा दैवी गुण आहे. आपण निरागसपणे म्हणजेच स्तितप्रज्ञतेने जगाकडे पाहू तर सुख, आनंद, समाधान आपोआप मिळेल. आपण आनंदी राहू निरागस बालकासारखे.*
*पैस्याने सुख म्हणजेच फॅसिलिटीज विकत मिळतात पण त्या चिरकाल टिकत नाहीत. आनंद हा पैस्याने विकत मिळत नाही. कारण तो आत्मिक असतो. भौतिक साधनाने तो प्राप्त होत नाही.*
*आत्मा आणि जीव यातील भेद कळला की जीवनाची गणिते आपोआप सुटतात..*
*—— पांडुरंग कुलकर्णी नाशिक*