*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*
*काव्यपुष्प-६७ वे*
———– ———– ——
भावनांची महती । दगडाची मुर्ति । देव बनते । म्हणती महाराज ।। १।।
शुद्ध भावना मनी असती । वसे अंतरात भक्ती ।
चैतन्य लहरी प्रकटती । सभोवार ।। २ ।।
परमात्म्याची रुपं असती । दिसती विविध जरी ती ।
श्रीशंकर, श्रीकृष्ण एकच असती । महाराज सांगती,
भक्त विष्णुपंता ।। ३ ।।
सामान्य माणसानं । जावं भगवंता शरण । करावे नामस्मरण। जाते वासना आपोआप, महाराज म्हणती।।४।।
संतांपासुनी नाम घ्यावे । आवडीने नाम घ्यावे । मना समाधानी करावे । सांगणे महाराजांचे भक्तांना ।। ५ ।।
घडता सत्संगति । तेंव्हा नामी वृत्ती गुंगती । सहज पालटे मती । ही महती नामाची ,सांगती श्रीमहाराज ।। ६ ।।
*******
करी क्रमशः लेखन कवी अरुणदास ..
———– —————————–
श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-६७ वे
कवी-अरुणदास- अरुण वि.देशपांडे-पुणे.
—————————————–