*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्री नरहरी सोनार जयंती दिना निमित्त वंदन!*
*”संत नरहरी सोनार”*
नरहरी सोनार पंढरपूरकर आहेत
धन्य पंढरपूर क्षेत्र संतांचे माहेर स्थान IIधृII
जन्मले पंढरी नगरीत सोनार घराण्यांत
बालपणापासून त्यांना ईश्वर भक्तीची आस
शिव उपासक नित्य बेल फुले अर्पित भक्तII1II
सुवर्णकार म्हणूनच त्यांची सर्वत्र ख्यात
अलंकार कलाकुसर करण्यात निष्णांत
विठूला करावी सोनसाखळी सांगितले धनकोनंII2II
कटीचे मापाने साखळी आली बनवण्यांत
साखळी मापापेक्षा होई कमी जास्त अद् भूत
शिवभक्त नरहरी येईनात विठू मंदिरांतII3II
डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी आले देवळांत
माप घेताना व्याघ्र चर्म स्पर्शले शेषनाग गळ्यात
उघडले नेत्र संपले द्वैत झाला शिवाचा दृष्टांतII4II
नरहरींचे भागवत धर्मात अव्वल स्थान
शिवा विठ्ठल भक्तीत वेचिले सर्व जीवन
समाधीस्थ ज्ञाना नामदेव चोखा निवृत्तींचे साक्षीनंII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.