*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक मालवणी लेखक कवी विनय सौदागर लिखित अप्रतिम मालवणी कविता*
*शंकेष्टी*
संकष्ट चतुर्थी
v/v/s…..
आज आसा शंकेष्टी
माश्यार मारलय लात
दोंपाराक साबुदाणो
सांचो वराण भात
सकळ सकळ न्हालय नी
रेडयेक जावन् इलय
येताना वायच् ढँग लावन्
लिंबू सरबत पिलय
लाल फूल शेजाऱ्याचा
शाळेकडली दुर्वा
लाॅक वायच् बडबडतत
माका नाय पर्वा
शेंगदाण्याक आपलेपान
साबुदाणो रुसलो
उपासाच्या आदले राती
पाणयात फुगान बसलो
पुरो दिस खा खा खालय
उपासगीत गालय
भटाक बोलावन् सांच्यावक्ता
गनेसभक्त झालय
राती बरी आरत झाली
मोदक होते पानार
कापरार हात भाजतकच्
झपकन इलय भानार
देव धरम रित भात
मिसळान जावचा जिवान
मीच ता परब्रह्म
हळुच सांगाचा शिवान
येक दिसा उजवाडात
उपास तापास सरतीत
हुंदराच्या शेपटेशिवाय
भोळे जीव तरतीत.
(भोवताल-3….काव्यसंग्रह)
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802……४९