You are currently viewing आंगणेवाडी यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

आंगणेवाडी यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

मालवण :

 

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आंगणेवाडी श्री भराडी देवीचा वार्षिकोत्सव २ मार्च रोजी होत आहे. या यात्रेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असून देवीचे दर्शन घेत नतमस्तक होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्स्फूर्त स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना, मालवण तालुका शिवसेना यांच्या वतीने केले जाणार आहे. अशी माहिती शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे यांनी दिली आहे.

चिपी विमानतळ येथे २ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन होणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी ते रवाना होणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री आंगणेवाडी येथे दाखल होत श्री भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. असा दौरा कार्यक्रम असणार आहे. अधिकृत दौरा माहिती प्रशासन स्तरावरून लवकरच जाहीर केली जाईल. उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, शिवसेना नेते किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जाणार आहे, असेही बबन शिंदे यांनी सांगितले.

मालवण येथे पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, तालुकाप्रमुख महेश राणे, उपतालुकाप्रमुख पराग खोत, शहर प्रमुख बाळू नाटेकर, महिला उपाजिल्हाप्रमुख निलम शिंदे, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, चाफेखोल सरपंच रविना घाडीगावकर, चंद्रकांत गोलतकर, उदय गावडे, दीपक मीठबावकर, अभिषेक कांदळगावाकर, अश्विन हळदणकर, धिरज केळुसकर, कमलाकांत पाटकर, गीता नाटेकर, आशा वळपी, सुधीर चिंदरकर, अच्युत लोके, रुपेश करलर, उदय राऊत, निकिता तोडणकर, नेहा हळदणकर यांसह अन्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा