सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती पल्लवी राऊळ यांचे गौरवोद्दगार
सावंतवाडी :
बचत गटांच्या माध्यमातून विविध लहान मोठ्या उद्योग व्यवसायांमधून महिला आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत असल्याने खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण सुरू झाल्याचे दिसून येते. त्यामुळे माडखोल प्रभागातील ९ प्रभागांचे कार्य हे इतर महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. असे गौरवोद्दगार सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती पल्लवी राऊळ यांनी काढले.
हिरकणी माडखोल प्रभागसंघाच्या सभेत पल्लवी राऊळ बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माडखोल हिरकणी प्रभागसंघा अध्यक्षा आकांक्षा किनळोसकर, सचिव माधुरी चव्हाण, कोषाध्यक्ष शेजल लाड, माडखोल सरपंच शृश्नवी राऊळ, वेलेॅ सरपंच रूचिता राऊळ, सावरवाड सरपंच देवयानी पवार , बँक अधिकारी किशोर रोडी, बँक आँफ इडियाचे माडखोल शाखा व्यवस्थापक क्रिस्विन बनाॅड, सावंतवाडी महिला समुपदेशन केंद्राच्या अपिॅता पाटवे, कृषी विभागाचे प्रताप चव्हाण, आरएसइटीआयचे स्टार प्रचारक यशवंत पाटकर, माडखोल सहाय्यक श्रीम. पाटील, सिआरआय एस आयएल फांऊंडेशनच्या लक्ष्मी पाडवी आणि माडखोल प्रभागातील सर्व सीआरपी व इतर केडर उपस्थित होते.
यावेळी बँक अधिकारी किशोर रोडी, बँक आँफ इडियाचे माडखोल शाखा व्यवस्थापक क्रिस्विन बनाॅड यांनी हिरकणी माडखोल प्रभागसंघाच्या मागील सात वर्षाची परिस्थिती लक्षात घेता व त्यांच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतल्याने या प्रभागातील महिलांची होत असलेली प्रगती पाहता त्यांना आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी व त्यांच्या उद्योग व्यवसायांसाठी बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी आर्थिक सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली. तर सावंतवाडी महिला समुपदेशन केंद्राच्या अर्पिता वाटवे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना महिलांच्या झालेल्या प्रगती बाबत गौरवोद्गार काढून या प्रभागातील महिलांची एकजूट पाहता भविष्यात या महिला अधिक मोठ्या उद्योगांमध्ये झेप घेऊन या भागात मोठी आर्थिक संपन्नता येईल सांगितले.
यावेळी अन्य अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी महिलांना बहुमोल मार्गदर्शन केले. माडखोल हिरकणी प्रभाग समन्वयक कुवरसिंग पाडवी यांच्या नियोजनाखाली झालेल्या या ८५७ महिला उपस्थित होत्या.