*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना निवडणूक आचारसंहीता लागण्यापुर्वी गृहोपयोगी भांड्यांचे वाटप करा , भाजपा कामगार मोर्चाची सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे मागणी*
सिंधुदुर्ग
भाजपा कामगार मोर्चा , सिंधुदुर्ग च्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांची भेट घेऊन , निवडणूक आचारसंहिता कालखंड सुरु होण्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना ३० गृहोपयोगी भांड्यांच्या संचाचे वाटप करावे , अशी मागणी कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली .
महाराष्ट्रातील भाजपा महायुती सरकारच्या नवीन धोरणानुसार सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ३० गृहोपयोगी भांड्यांचा संच देण्यात येणार आहे . त्यामुळे कामगार वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे . ह्या गृहोपयोगी वस्तु लोकसभा निवडणूक आचारसंहितेपुर्वी देणे आवश्यक आहे . त्यासाठी लवकरात लवकर याची कार्यवाही व्हावी अशी मागणी कामगार अधिकारी यांचे कडे केली .
तसेच लवकरच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नोंदणीकृत कामगारांचा मेळावा आयोजित करुन , त्यांच्याच उपस्थितीत गृहोपयोगी भांड्यांचे वाटप कार्यक्रम करणार असल्याचे भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी सांगितले .
यावेळी कामगार मोर्चाचे कोकण विभाग अध्यक्ष लिलाधर भडकमकर , लोकसभा मतदारसंघ संयोजक उदय गोवळकर , सावंतवाडी विधानसभा संयोजक सत्यम नारायण सावंत , कोकण विभाग का. का. सदस्य आबा पोखरणकर , सावंतवाडी मंडल अध्यक्ष विनोद सावंत , बांदा मंडल संयोजक संजय सावंत इत्यादी उपस्थित होते .