You are currently viewing आर्या नोवा मल्टीप्लेक्स चे शानदार उद्घाटन…

आर्या नोवा मल्टीप्लेक्स चे शानदार उद्घाटन…

प्रदीप जोशी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव निरूखेवाडी येथे नव्याने सुरू होत असलेल्या आर्या नोवा मल्टीप्लेक्सचे आज बांधकाम विभागाचे निवृत्त अधिकारी प्रदीप जोशी यांच्या हस्ते फित कापून आणि दिप प्रज्वलन करून शानदार उद्घाटन करण्यात आले आहे.

यावेळी उद्योजक शैलेश पई, ब्राम्हण मंडळाचे अध्यक्ष राजाराम चिपळूणकर, मंगेश कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

आर्या नोवा मल्टिप्लेक्स च्या उद्घाटनाच्या शुभप्रसंगी महाराष्ट्रच्या मातीचा अविस्मरणीय इतिहास सांगणारा “तानाजी” व महाराष्ट्रतील मातीत जन्मलेल्या कणखर मातेची कथा सांगणारा “हिरकणी” हे दोन चित्रपट दाखवण्यात आले आहेत. या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडी तालुक्यातील अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − sixteen =