जानवली येथील वृध्द महिलेची आजारपणाला कंटाळून आत्महत्या
कणकवली
जानवली -घरटनवाडी येथील कल्पना दिनकर राणे(८०) यांनी आजारपणाला कंटाळून स्वतःला घराच्या पाठीमागील पडवीत आग लावून घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजण्याच्या मदतीत घडली. कल्पना राणे यांना मधुमेह व उच्च रक्त दाबाचा आजार होता. त्यांनी आजारपणाला कंटाळून राहत्या घराच्या पाठीमागील पडवीत आग लावून घेत आत्महत्या केली.
याबाबतची खबर मोहिनी मंगेश राणे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.