बनावट “मनी कंट्रोल ॲप” द्वारे कणकवलीतील डॉक्टरची 32 लाखाची फसवणूक
संशयित सावंतवाडीतील तिघांवर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल
कणकवली
शेअर्स खरेदी करून जास्त फायदा मिळवून देतो असे सांगत बनावट “मनी कंट्रोल अॅप” द्वारे बनावट स्टेटमेंट देऊन कणकवलीतील डॉ. सूर्यकांत नारायण तायशेटे व त्यांच्या पत्नी शुभांगी तायशेटे यांची ३२ लाख ९४ हजार ९३४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी विवेक विजय पार्टे, वेदिका वैभव पार्टे ( दोन्ही शिरोडा – नाका, सावंतवाडी ) व प्रथमेश श्रीकांत राणे ( इन्सुली सावंतवाडी ) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जिल्हाभरातील डॉक्टरांना या टोळीने अशा प्रकारे कोट्यवधींचा गंडा घालून फसवणूक केली आहे.
याप्रकरणी डॉ. सूर्यकांत तायशेटे (वय ७५, तेलीआळी रोड कणकवली) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. तायशेटे यांच्या दाखल फिर्यादीनुसार हा प्रकार कणकवलीतील आबु तायशेटे हॉस्पिटल येथे १९ जुलै २०२२ ते २७ डिसेंबर २०२३ या दरम्यान घडला. संशयित तिन्ही आरोपीनी एकमेकांच्या संगनमताने फिर्यादी यांना तुम्हाला शेअर्सचा जास्त फायदा मिळवून देतो असे सांगितले. तसेच फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत त्यांना “मनी कंट्रोल अॅप डाऊनलोड करून दिला. तसेच बनावट स्टेटमेंट देखील दिले.
या बदल्यात फिर्यादी यांच्याकडून संशयीत यांनी चेक द्वारे पैसे घेतले. मात्र कोणत्याही प्रकारचे शेअर्स खरेदी करून दिले नाहीत. यामध्ये सूर्यकांत तायशेटे यांच्याकडून २० लाख १९ हजार ९३४ व त्यांची पत्नी हिच्याकडून १२ लाख ७५ हजार असे एकूण ३२ लाख ९४ हजार ९३४ एवढ्या रकमेची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित आरोपीच्या विरोधात भादवी कलम ४०६, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे करत आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून काही जणांची अशा प्रकारे या ऍपद्वारे फसवणूक झाल्याची चर्चा आहे. यामधील कणकवलीतील व कुडाळ मधील देखील काही नावे चर्चेत आहेत.
*संवाद मीडिया*
🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕
*mai hyundai*
*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*
*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/
*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*
*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*
*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*
*फो. +91 7410006037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*