You are currently viewing भेंडखळ येथे योग शिबिर उत्साहात संपन्न !!

भेंडखळ येथे योग शिबिर उत्साहात संपन्न !!

उरण – रायगड जिल्हा:

युवक संघटना भेंडखळ व सक्सेस फाऊंडेशन उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने योग अभ्यास शिबिराचे आयोजन ठाणकेश्वर मैदान भेंडखळ, तालुका – उरण येथे करण्यात आले होते. कोरोना काळात खऱ्या अर्थाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे आणि त्यादृष्टीने योगसाधनेला अतिशय महत्व आहे असे युवक संघटना भेंडखळ (उरण ) चे प्रमुख अनिल ठाकूर यांनी यावेळी सांगितले. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थ व सक्सेस फाऊंडेशन चे मनापासून आभार मानले.

या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. नागरिकांना विविध योगासने प्रात्यक्षिके शिकविण्यात आली.आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त अशा या कार्यक्रमामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले.

या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष गणेश म्हात्रे, भालचंद्र घरत, समाजसेवक संतोष पवार, सक्सेस फाऊंडेशन उलवे तर्फे बालकृष्ण भगत, निलेश ठाकूर, सुरज भगत, निलेश ठाकूर व त्याची महिला टिम तर युवक संघटनेतर्फे अनिल ठाकूर, मच्छिंद्र घरत, कविश ठाकूर,चंद्रविलास घरत, प्रांजल भोईर, राजेश ठाकूर, संदिप म्हात्रे, अमेश ठाकूर, जन्मेजय भोईर, रूण्मय ठाकूर, मनोज पाटील, भावनेश ठाकूर, मिनल ठाकूर, किरण घरत, घनश्याम घरत, जयेश घरत, मनोज भोईर तसेच मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर असे कार्यक्रम आयोजित करणे काळाजी गरज बनत चालली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा