*ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वाट ही काटेरी*
वाट ही काटेरी तुडवून पाऊले
रक्ताळलेली,
टोकेरी दगडावरुन चालतांना
ठेचकाळलेली,
शरीरात न उरले त्राण,पाऊले आता थकलेली,
कासावीसी जीवाची,काहिलीसम
करपून गेली.
आशा न उरली आता जीवन सुखाने
जगण्याची मनी,
हाती नाही पैसा अडका, नातीगोती
न जवळ कुणी,
होते नव्हते ते सारे संपले,कष्टाचे न उरले काही
देह आता साथ देईना,कष्टकरण्या
न जमते काही.
जोपर्यंत होते धन तोवर होती शान
सन्मानाचे हार,
पद संपले, साथ संपली, दूरदेशी
मुलांचे संसार,
बाबा तुम्ही कसे आहात खुश रहा
असे सांगून,पैसे पाठवून देती ते
वडिलांना आधार,
भेटण्यासाठी नसतो वेळ,समोर
काम,आणि संसार.
आता तर क्षणक्षणाला वाढती नवे
दुर्धर आजार,
खूप कष्टाने उभारलेले आयुष्यसारे
कोलमडले पार,
कशास सांगावी मुलांना आपल्या
दुःखाची धार,
संपवावे असेच आपल्या आयुष्याचे
दुःखी कथासार.
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
मुंबई विरार.