You are currently viewing माझी मराठी

माझी मराठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझी मराठी*

 

माझ्या मराठीचं लेणं

चकाकते लख्ख भारी

डंका जगात अवघ्या

मराठीची ही खुमारी।।

 

गोड मधुर रसाळ

पैज अमृताते जिंके

भाषा लाघवी सुंदर

पैंजणाचे बोल फिके।।

 

ज्ञानेश्वरी मराठीत

पाया सुंदर रचला

ओवी ,अभंग भारूड

रंग लोभस शब्दाला।।

 

अभिमान मराठीचा

साहित्यिक कलावंत

सेवा केली मराठीची

थोर कवी आणि संत।।

 

मातृभाषा आपुलीच

मान तिला जगी ठेवू

वाढवूया कौतुकाने

सन्मानाने ती मिरवू।।

 

 

〰️〰️〰️〰️〰️🌹✒️

*अरूणा दुद्दलवार@✒️*

प्रतिक्रिया व्यक्त करा