You are currently viewing स्मृति भाग ५२

स्मृति भाग ५२

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*स्मृति भाग ५२*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आज आपणास नवीन स्मृतिची सुरवात करावयाची आहे . पण तत्पूर्वी काही मजेशीर चर्चा आपणासमोर मांडावयाची आहे . ते आमच्या काल्पनिकतेचे सौंदर्य आहे का बावळटपणा आहे का अंधचित्रीकरण आहे !!! हे मला समजले नाही , म्हणून आपणासमोर मांडत आहे . मी यासाठी *अंधश्रद्धा* या बावळट शब्दाचा वापर का करत नाही , ते ही सांगतो . श्रद्धा हा शब्द माझे नजरेत *विश्वास+स्नेह+सात्विक भावनांचा उद्रेक = श्रद्धा* मग पुन्हा प्रश्न येतोच , श्रद्धा तुटते कशी ? तर *अंधविश्वास ( वा विश्वासाचा अतिरेक ) + स्नेह + राजस वा तामस भावनांचा उद्रेक = श्रद्धा घात !* कारण श्रद्धेविरुद्ध अश्रद्धा हाच शब्द . श्रीमद्भगवद्गीतेत अंधश्रद्धा शब्दाला थाराच नाही !!!! किबहुना भारतावरील इंग्रजी आक्रमणापर्यंत कुठल्याही भारतीय भाषेत या शब्दाचा वापर हा त्या त्या भाषेच्या साहित्यात दिसत नसावा !! ( तज्ज्ञांनी जरुर अभ्यास करावा !!) असो . मी आपल्या विषयाशी निगडित एक कथा मांडत आहे . कथा मारुतिरायाची ! मारुति लहानपणीच सूर्य गिळायला धावला . हनुमन्ताने जर सूर्य गिळला तर ब्रह्माण्ड चालेल कसे ? किती बदल होतील ? हा प्रश्न इंद्राला पडला व इन्द्राने त्यावर वज्राघात केला . पण ते वज्र त्याचे हनुवटीला चाटून गेले वा त्याचा हनुस्पर्श झाल्याबरोबर इन्द्राने आवरते घेतले वा आवरण्यास इतर देवांनी भाग पाडले . त्यामुळे हनुमन्ताची हनुवटी तेंव्हापासून सुजलेली !!! वा आकार बदललेली !!! एवढ्या गोष्टीच्या मागोव्याने एक पुस्तक लिहिले जाईल !!! पण इथे एकच मुद्दा उपस्थित करतो . आम्ही चित्रांमधे वा चित्रपटांमधे आघात फक्त हनुमंतापुरताच असतांना सर्व वानरांची तोंडे वा हनु सुजलेली का दाखवतो ?? कारण सर्व वानरजात ही काही या ब्रह्मचार्‍याची प्रजा नाही वा त्यावेळे हनुमन्ताला वज्र मारले म्हणून सर्व वानरांनी आपले तोंड सुजवून घेतल्याचा उल्लेखही नाही !! एवढेच काय आम्ही अंजनी मातेचेही तोंड सुजलेलेच दाखवतो !!!! तसे या कथानकाचा माझ्या नजरेतला अर्थ मी केंव्हातरी चर्चेत घेईनच . आज येवढा एकच प्रश्न पुरे ! ( पण प्रत्यक्षातही सर्वच वानरांची हनुवटी अशीच का असते ? ) एका कथेमुळे जर अजून ईतका गोंधळ तर आम्हाला स्मृतिंचे अर्थ कसे समजावे ?? आणि खरे अर्थ न समजताच आम्ही स्मृतिग्रंथांची हेळसांड का करावी ??? हत्या का करावी ????

आज थांबतो . तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . उद्या दक्षस्मृति सुरु करु . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा