सिंधुदुर्गातून जिल्हा बँक अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती
वेंगुर्ला :
केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशातील प्राथमिक विकास संस्थाना स्वावलंबी बनविण्यासाठी देशातील २५००० विकास संस्थांचे संगणकीकरण करण्यात आले. आज २४ फेब्रुवारी २०२४ रोजी दिल्ली येथे या कामकाजाचे उद्घाटन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री श्री. अमित शहा यांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे हे उपस्थित राहीले. तसेच फोंडाघाट, मातोंड, कर्याद नारुर या विकास संस्थांचे अध्यक्ष सहभागी झाले होते.