*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*स्मृति भाग ५१*
समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
नंतर काही श्लोक श्राद्धाचे येतात . त्यातील श्राद्ध भोजन संदर्भात येणारा पुढील श्लोक—
*पुनर्भोजनमध्वानं भाराध्ययनमैथुनम् ।*
*दानं प्रतिग्रहं होमं श्राद्ध भुक्त्वाष्ट वर्जयेत्॥*
पुन्हा जेवण करणे , वाट चालणे , वजन उचलणे , अध्ययन , संभोग , दान देणे , आदान ( प्रतिग्रह — दान घेणे ) , आणि होम ह्या आठ गोष्टींचा श्राद्ध भोजनोत्तर परित्याग करावा .
या सर्व गोष्टींवर ऋषिंनी लक्ष ठेवणे ! की सर्वसामान्यांकडून स्वमर्जीने किंवा कुणाच्या आग्रहाखातर माणसाकडून प्रमादवश चुका घडू शकतात !!!! हा सूक्ष्म विचार नाही वाटत ? यातून ऋषिंचा मोठेपणा किंवा ऋषिंची मानव जाती प्रती निष्ठा , प्रेम , भाव नाही जर आम्हाला दिसले नाही तर आम्ही स्वतःला माणूस म्हणवून घेण्यास योग्य आहोत ?? पुढे पाप करणार्यावर अनुग्रह करणार्यांसाठी एक श्लोक येतो .
*स्नेहाद्वा यदि वा लोभाद्भयादज्ञानतोSपि वा ।*
*कुर्वन्त्यनुग्रहं ये तु तत्पापं तेषु गच्छति ॥*
स्नेहामुळे , लोभामुळे , अज्ञानामुळे , जो पाप करणार्यावर अनुग्रह करतो , ते पाप त्यास ( अनुग्रह करणारास ) प्राप्त होते .
हा सिद्धांतच आहे , नाही का ? सरळ भाषा , सोपी भाषा ! चटकन समजेल अशी भाषा ! तुम्ही जाणा वा न जाणा ! तसे वागा वा न वागा ! ऋषि सांगून मोकळे ! *कर्मशिक्षण + जीवनसार = स्मृति* असंच नेहमी वाटतं मला !!
*पूरणे कूपवापीनां वृक्षच्छेदनपातने ।*
*विक्रीणीते गजं चाश्वं गोवधं तस्य निर्दिशेत् ॥*
जर कुणी मनुष्य आड अथवा विहीरीस आटवत असेल वा बुजवत असेल , वृक्ष कापत असेल वा पाडत असेल , हत्ती व घोड्यांचा विक्रय करत असेल , तर त्यासाठी त्यास गोहत्येस दिले जाणारे प्रायश्चित्त द्यावे .
सदर श्लोकातून चार गोष्टी कळतात . १) पाण्याचं नियोजन , २)वृक्षसंवर्धन , ३)हत्ती व घोडे यांची काळजी (कारण पूर्वी हत्ती व घोडे युद्धास लागत असत . तसेच इतर कामांसाठीही त्यांचा वापर होत असे . आज शक्ति ही अश्वशक्तीत मापली जाते . पूर्वी आपल्या मापन शास्त्रानुसार नागशक्तीत मापली जायची !! नाग म्हणजे हत्ती ! संस्कृत शब्द आहे तो !! आम्हाला अट्टाहासाने असंस्कृत व्हायचे असेल तर नाही कळणार ना पूर्वजांची शक्ति !! ) आणि ४)गोमातेबद्दल असणारी आस्था , या चार गोष्टी .
*मार्जनी रजसासक्ते स्नानवस्त्रघटोदके ।*
*नवाम्भसि तथा चैव हन्ति पुण्यं दिवाकृतम् ॥*
स्नानाचे वस्त्र , घड्यात भरलेले पाणी वा नवीन जल यास केरसुणीची धूळ जरि लागली तरी त्या दिवसाचे अर्जित केलेले पुण्य ती हरते .
ऋषिंनी सांगितलेल्या अशा बारीक गोष्टींवर आपल्या हातून पाप घडू नाही म्हणून लक्ष ठेवले पाहिजे !!
आज थांबतो . तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना ? 🙏🙏
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹