मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मनविसेनेच्या वतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन..
सावंतवाडी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्राचे जेष्ठ कवि विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून या दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, सावंतवाडी यांनी तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर निबंध स्पर्धा ५ वी ते ८ वी आणि ९ वी ते ११ वी या गटात होणार असून आपल्या प्रशालेतून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन मनसे च्या वतीने करण्यात आले आहे.या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना चषक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे निबंध प्रशालेने नावं लिहून घेऊन जमा करावेत. दिनांक २८/०२/२०२४ पर्यंत हे निबंध प्रशालेने आपल्याकडे जमा करावेत. हे निबंध दिनांक २९/०२/२०२४ ते ०१/०३/२०२४ या कालावधीत प्रत्येक प्रशालेतून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे गोळा करण्यात येतील. आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना आवाहन करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेऊन आमच्या या स्पर्धेस सहकार्य करावे असे आवाहन मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी केले आहे.