मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
महाराष्ट्र शासनाच्या ठाणे ग्रंथोत्सवमध्ये स्वाती काळे लिखित “वेध संस्कृतीचा” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले.
मा. आमदार लहू कानडे, विधानसभा, महाराष्ट्र, राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका, डॉ. दिलीप पांढरपट्टे, भाप्रसे, सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, सुभाष कुलकर्णी, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती कला मंडळ, सुदेश हिंगलासपुरकर, प्रकाशक, ग्रंथाली, प्रशांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी या नामवंतांच्या मांदियाळीत ‘वेध संस्कृतीचा’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे थाटामाटात अनावरण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या ‘वस्तू व सेवा कर विभागा’त ‘सहआयुक्त’ या पदावर कार्यरत असणाऱ्या स्वाती काळे लिखित हे पुस्तक तरुण भारत, नागपूर येथील ‘आसमंत’ पुरवणीतील लेखमालांचा साधार संग्रह आहे. आजपासून या पुस्तकाचे प्री बुकिंग सुरू झाले आहे. प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी ३० टक्के सवलत आहे. नोंदणीसाठी मुकुंद जोशी 9867651490 यांच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. पुस्तकाचा प्रकाशन समारंभ लवकरच संपन्न होईल आणि पुस्तक घरपोच पाठवले जाईल.