सिंधुदुर्गातील 38 स्काऊट गाईडची राज्य पुरस्काराला गवसणी
सिंधुदुर्गनगरी
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय राज्यपुरस्कार चाचणी शिबिरामध्ये जिल्हयातून 17 स्काऊट आणि 21 गाईड नी सहभाग घेतला होता.या शिबिरामध्ये सर्वजन यशस्वी झाले असल्याची माहिती स्काऊट/ गाईट, जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड मुंबई यांच्या विद्यमाने माहे डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत तीन दिवशीय निवासी चाचणी शिबिर, राज्य प्रशिक्षण केंद्र सोनतळी जिल्हा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या चाचणी शिबिरात लेखी, तोंडी, प्रात्याक्षीक अश्या चाचण्या घेण्यात आल्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील टीमने परिक्षणाचे कार्य केले या शिबिराकरीता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्काऊटस आणि गाईडस यांनी सहभाग नोंदविला होता
या राज्यस्तरीय चाचणी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्हयातील स्काऊट गाईडनी यशस्वी व्हावे म्हणून जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्य/योजना) प्रदिपकुमार कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाचणी पुर्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 5 लेखी सराव परीक्षा व एक दिवस प्रात्याक्षीक परीक्षेचे आयोजन माहे डिसेंबर 2023 मध्ये स्काऊट गाईड कार्यालय येथे करण्यात आले होते.
यशस्वी स्काऊट आणि गाईडचे अभिनंदन जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्का/गा प्रकाश कदम, जिल्हा चिटणीस श्रीम.क्लारा डिसोजा, सह. चिटणीस श्रीम.अ.अ.अवटी, कोषाध्यक्ष श्रीम स्नेहलता राणे, मुंकूद जाधव, रामचंद्र आंगणे, शोभराज शेलेंकर, श्रीम. श्रध्दा कदम, श्रीम. श्रध्दा कुलकर्णी, विठोबा लब्धे, जे जे शेळके, अरंविद मेस्त्री, श्रीम सुरेखा कदम, श्रीम विनयश्री पेंडणेकर, धोंडू रेडकर, नितिन सावंत, सर्व कार्यकारिणी मंडळ यांनी केले आहे. 14 व्या वर्षी राज्य पुरस्कार पुढे राष्ट्रपती पुरस्कारासारख्या अभ्यासक्रमाच्या पायऱ्या स्काऊट विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या अजोड बाजूसाठी मजबूती तर देतातच शिवाय कौशल्याकडून चरितार्याकडे नेण्यास पूरकही ठरतात. ही चळवळ म्हणजे स्काऊट गाईड मुलांसाठी एक मुक्त व्यासपीठ. असे प्रसिध्दीपत्राव्दारे कळविले आहे.