वेंगुर्लात शनिवारपासून गरुडझेप महोत्सव
वेंगुर्ले
जबरदस्त सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ राऊळवाडा वेंगुर्लेतर्फे २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘गरुडझेप’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता नायरा पेट्रोल पंप राऊळवाडा येथे रक्तदान शिबिर, सायंकाळी ७ वाजता जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा, या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहेत. रविवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा नं.४ श्री देवी सातेरी मंदिरनजिक जिल्हास्तरीय चित्रकला व रंगभरण स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा चार गटात होणार आहे. प्राथमिक गट पहिली ते दुसरी रंगभरण स्पर्धा, तिसरी ते चौथी विषय- झाडाखाली बसलेला प्राणी, पाचवी ते सातवी, विषय- आवडता खेळ किंवा सण, आठवी ते दहावी, विषय- समुद्र किनारा स्वच्छता करणारी मुले, सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात येणार आहे.या स्पर्धेत प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या ५० महिलांना सहभाग देण्यात येणार आहे. वेंगुर्ला क्विन सौंदर्य स्पर्धा सायंकाळी ७ वाजता वेंगुर्ले क्विन २०२४ स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा नायरा पेट्रोल पंप राऊळवाडा येथे होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार व ३ हजार तसेच बेस्ट स्माईल १०००, बेस्ट हेअर १०००, बेस्ट लुक १००० अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. सोमवार २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नायरा पेट्रोल पंप राऊळवाडा जवळ नाचणीच्या पिठापासून पदार्थ याँ विषयावर पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ७ वाजता बक्षीस वितरण समारंभ व लकी ड्रॉ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर ८ वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ दांडेली-ओरोस यांचा ट्रिकसिन्सयुक्त ‘शिवपदस्मरण अर्थात मांस पत्नीचे ताट भोजनाचे’ हे नाटक होणार आहे. या निमित्ताने रिल्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी साबाजी राऊळ (९६७३५०७९४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अजित राऊळ यांनी केले आहे.