You are currently viewing राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहीत्यिक व कलावंत मानधन योजना समितीकडे ३५० प्रस्ताव दाखल – संतोष कानडे

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहीत्यिक व कलावंत मानधन योजना समितीकडे ३५० प्रस्ताव दाखल – संतोष कानडे

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहीत्यिक व कलावंत मानधन योजना समितीकडे ३५० प्रस्ताव दाखल – संतोष कानडे

कणकवली

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहीत्यिक व कलावंत मानधन योजना समितीकडे चालु वर्षामध्ये ३५० प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी गरजु, होतकरु कलाकारांना न्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. ख-या अर्थाने कोकणचे नेते, केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे. राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन समितीच्या माध्यमातून कलाकारांना मान, सन्मान देण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावत आहोत. जिल्ह्यासाठी शंभर कलाकारांचे मानधन प्रस्ताव मंजुरीचा कोठा आहे. तो किमान कोकणातील कलाकारांसाठी दोनशे करण्यात यावा अशी शासनाकडे मागणी केली आहे. ज्या कलाकरांचे प्रस्ताव मंजुर झाले आहेत. त्यां कलाकारांना भाजपकडून पत्र वाटप करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी दिली.

कणकवली येथील केंद्रीयमंत्री नारायण राणे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मिलींद मेस्त्री, माजी सभापती दिलीप तळेकर, भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणा-या कलाकारांची सेवा करण्याची संधी आपल्याला केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या सुचनेनुसार जे जेष्ठ वृध्द कलाकार आहेत. त्यांना लवकरात लवकर मानधन चालु व्हावे. यासाठी आमची समिती काम करत आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा कणकवली तालुक्यातील कलाकारांना जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न आहे. ना. नारायण राणे आणि आ. नितेश राणे यांनी मला जबाबदारी दिली. भाजपा पक्षाचा कार्यकर्ता असल्यानेच कलाकारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. आता शंभर प्रस्ताव मंजुर केल्याने त्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा झाले आहे. त्यामुळे या सर्व कलाकारांना भारतीय जनता पार्टीकडून मानधन मंजुर प्रस्तावाबाबत पत्र देत त्यांचा सन्मान केल्याचे श्री. कानडे यांनी सांगितले.

 

देश पातळीवर काम करणाऱ्या कलाकारांना अ गटात ४२०० रुपये मानधन तर राज्यातील ब गटात ३८०० रुपये मानधन ,जिल्हास्तर गट २२०० रुपये मानधन, जिल्ह्यात १०० कलाकारांमध्ये महिला, अपंग सोडून ६२ कलाकारांना संधी दिली जाते. जो वृध्द कलाकार असेल त्यांनाच न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एखाद्या कलाकारचे निधन झाले तर त्याच्या पत्नीला मानधन योजना लागू आहे. त्यात – मूर्तिकार, भजनी, बँड पथक कलाकार पण या योजनेचा लाभार्थी होवू शकतात. असेही श्री. कानडे यांनी सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा