You are currently viewing मनाचं पाखरु (व-हाडी) कविता

मनाचं पाखरु (व-हाडी) कविता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम वऱ्हाडी भाषेतील काव्यरचना*

 

*मनाचं पाखरु* ( *व-हाडी) कविता*🕊️

 

आभायीचा चांद मले आज अलगच दिशे…….

लुकुलुकु चांदन्याबी त्याच्यासंग

कशा हाशे…….

अशी कशी मी निंगाली झपाटल्या वा-यावानी……

नदीच्या थडीले पार दिसते का कुठी कोनी……..

बानागत आला आन् उरात रुतला ………

तुले पाह्यता पाह्यता जीव महा

हारकला ……..

पापनीच्या पदरात तुले देल्ला म्या आडोसा……।

डाव माहा हारवला जितला तुवाच फासा……

जीव कसा तळमळे कोनाले रे कशे सांगू………

एगळंच दुखनं हे दवा न्हाई होत लागू……..

तुले तरी काय म्हनू मीच हाओ

येडी खुळी….

अशी कशी वाजन रे यका हातानंच टाळी…..

मनाच्या कोनाड्यात तुही मूरत ठेवते…….

मन पाखरू होऊन भिरभिरत

राह्यते…..!!🕊️

 

🦋🍃🍃🍃🍃🍃🦋🕊️

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा