*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मृणाल प्रभुणे लिखित अप्रतिम बालकविता*
*आई गं आई..*
आई गं आई..
मी रूसलोय तुझ्यावर पार
बाळालाच तू हल्ली
घेत असतेस फार ..
आधी मी तुझा
होतो किती गं लाडका
बाळ घरी आल्यावर
झालोय मी गं दोडका..
तुम्ही सगळे आधी माझे
किती लाड करायचे
बाळ घरी काय आले
सारेच मला विसरले..
सगळे घरच झाले
आपले बाळातच दंग
बाळ झोपलंय म्हणून
माझं खेळणं, रडणंसुद्धा बंद..
आई आई मला
तुझे हाताने भरव नं
झालो बाळाचा दादा जरी
तरी फार नाही मी मोठा गं ..
जेंव्हा बघावे तेंव्हा
बाळच तुझे मांडीवर
मलाही जवळ घे ना
झोप आलीय गं डोळ्यावर..
आई गं आई..
आता तरी माझेकडे बघ नं
नाहीतर रूसवा तुझ्यावरचा
वाढतच जाईल माझा कायमचा..
मृणाल प्रभुणे
नाशिक.