वाॅव किड्स रायन प्री स्कूल, सावंतवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम जल्लोषात :
सावंतवाडी
दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ या दिवशी वाॅव किड्स रायन प्री स्कूल, सावंतवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, कोलगाव प्रशालेच्या भव्य रंगमंचावर मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष श्री. बबन साळगावकर हे होते. उपस्थित पाहुण्यांचे लहानसे रोपटे व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. शाळेचे संस्थापक मा. अॅडवोकेट श्री. रुजुल पाटणकर, मा. श्री. रामप्रसाद पाटणकर, मा. सौ. रुचा पाटणकर व मा. सौ. कश्मिरा पाटणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात शाळेचा वार्षिक अहवाल प्रदर्शित करून शालेय सहा. शिक्षिका लिबान साविओ फर्नांडिस यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाला गणेश वंदना करून सुरुवात करण्यात आली. तसेच शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बबन साळगावकर यांनी भाषण केले. यानंतर शाळेतील प्ले ग्रुपच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ‘ जंगल जंगल पता चला है ‘ हे प्राण्यांवर आधारित नृत्य केले. नर्सरी भाग एक या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याद्वारे आई वडिलांविषयी प्रेमभावना व्यक्त केली. नर्सरी भाग दोन या विद्यार्थ्यांनी हास्यरसावर आधारित विदूषकाचे विनोदी नृत्य सादर केले. ज्युनिअर केजी भाग एकच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांवर आधारित , तर भाग दोन च्या विद्यार्थ्यांनी मनमोहक मोर या पक्ष्यावर आधारित व भाग तीनच्या विद्यार्थ्यांना आदिवासी नृत्य सादर केले. सिनियर केजी भाग एक या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यद्वारे ‘ पाणी वाचवा ‘ हा संदेश दिला. तर भाग दोन या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याद्वारे ‘ झाडे वाचवा ‘ हा संदेश दिला. यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी नृत्य सादर केले व कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील नृत्य सादर केले. व त्यानंतर सर्व शिक्षकांनी मिळून स्वावलंबन, आत्मनिर्भरता, स्त्री ची स्वतःची ओळख व स्त्री रौद्ररूप आपल्या नृत्यातून सादर केले. अशाप्रकारे, सर्वांच्या नृत्य कलेद्वारे रंगमंच दुमदुमून निघाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षिका सौ. तुबा सलमान बिजली व दुर्गा गौतम सरनाईक यांनी केले. सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांनी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*