*भोसले फार्मसी कॉलेजमध्ये सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न*
सावंतवाडी
येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मसीवरील सहावी राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. या परिषदेचा मुख्य विषय हा फार्मसी क्षेत्राचा वर्तमान दृष्टीकोन आणि संभाव्यता असा होता.
सदर परिषद दोन सत्रात विभागण्यात आली होती. प्रथम सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजचे माजी कार्यकारी उपाध्यक्ष गणाधीश कामत उपस्थित होते. त्यांनी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये गुणवत्ता प्रणालीचा विकास कसा करता येईल व त्यासाठी सिक्स सिग्मा यासारख्या सांख्यिकी प्रक्रियांचा उपयोग कसा करावा याविषयी विवेचन केले. तर दुसऱ्या सत्रात गोवा फार्मसी कॉलेजचे प्रा.डॉ.आनंद महाजन यांनी लिक्विड क्रोमॅटोग्राफी व मास स्पेक्ट्रोमेट्री या तंत्राचा उपयोग इम्प्युरीटी प्रोफाइलिंग (अशुद्धतेचे वर्णन) करण्यासाठी कसा होतो याचे महत्व विशद केले.
या परिषदेत भारतातील विविध राज्यांमधून शोधनिबंधपर भित्तिपत्रकांचे सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये विविध महाविद्यालयातून आलेल्या भित्तीपत्रकांचे पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवीसह डॉक्टरेट या विभागांत वर्गीकरण करण्यात आले. या शोधनिबंधांचे निरीक्षण करून त्यातील उत्कृष्ट सादरीकरणाला प्रमाणपत्र व सन्मानचिन्हासह रोख बक्षीस देण्यात आले.
यामध्ये प्रथम पारितोषिक रु. २५००- ओम प्रकाश दाभोळकर, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, व्दितीय पारितोषिक रु. २०००- काळोजी पुरुषोत्तम, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, तृतीय पारितोषिक रु.१५००- मोहिनी तावडे, डॉ. डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे, चतुर्थ पारितोषिक रु. १०००- ओंकार सूर्यवंशी, शासकीय फार्मसी महाविद्यालय, रत्नागिरी, पाचवे पारितोषिक रु.७५० अथर्व परब, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी.फार्मसी तर उत्तेजनार्थ प्रमाणपत्र सालस कामत, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व मंथन सावंत, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी.फार्मसी यांनी मिळवले.
परिषदेला संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोंसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई ,प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक उपस्थित होते. परिषदेचे यशस्वी नियोजन मुख्य संयोजक आणि प्राचार्य डॉ. विजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रोहन बारसे, डॉ.गौरव नाईक, प्रा.तुषार रुकारी यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.गौरी भिवशेठ यांनी केले.
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*