*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रीराम* (*अष्टाक्षरी*)
दशरथ कौसल्येचा
सुकुमार सर्वश्रेष्ठ
रामराया ज्याचे नावं
लक्ष्मणाचा बंधु जेष्ठ
एकपत्नी एकबाणी
प्रजाहित ज्याचे मनी
आशीर्वाद देत असे
त्यासी सर्व ऋषीमुनी
सीता स्वयंवर दिनी
आशीर्वाद घेवुनिया
उचलले खङग ज्याने
स्वयंवर जिंकलेया
आज्ञा पित्याची घेवुन
निघे राम वनवासी
संगे सीतामाय निघे
बंधु लक्ष्मण सेवेसी
लंकाधीश रावणाने
भीक्षां देई म्हणवुनी
दृष्ट कट रचियले
नेली सीता पळवुनी
लवंकुश दोघेजण
वाल्मिकीच्या आश्रमात
सीतेसवे वनवासी
कष्ट केले दिनरात
अयोध्येचा राजपुत्र
केले वल्कले धारण
असुरांशी दिला लढा
केले सीतेचे तारण
लक्ष्मण बंधुराया
सेवा करी निरंतर
नाही घेतलीसे निद्रा
करी नित्य फलाहार
घनदाट जंगलात
गोदातीरी तपोवनी
वास्तव्यात रमलेते
प्रणकुटी सजवुनी
शुर्पणखा राक्षशीन
तीस रामाने वधले
राम रायाची नगरी
नावं नाशिक जाहले
*शीला पाटील. चांदवड.*