You are currently viewing रंग तुझा सावळा

रंग तुझा सावळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रंग तुझा सावळा*

 

भुलवितो तुझा मला रंग हाच सावळा

वाटतो हवा हवा स्पर्श तुझा मोकळा। ध्रु।

 

वेड लावते नजर

चुंबनाते मन आतुर

भ्रुंग करी गुंजारव तुझ्याभोवती कमळा

वाटतो हवा हवा स्पर्श तुझा मोकळा १

 

सतेज तुझ्या गालावरी

एक खळी हास्यापरी

पाहता गालावरी तीळ काळा काळा

वाटतो हवा हवा स्पर्श तुझा मोकळा २

 

चांदण्या जणू हसल्या

कुंदकळ्या दंवातल्या

अंतरी पेटवी मन्मथाच्या झळा

वाटतो हवा हवा स्पर्श तुझा मोकळा ३

 

भुलवितो तुझा मला रंग हाच सावळा

वाटतो हवा हवा स्पर्श तुझा मोकळा ४

 

राधिका भांडारकर पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा