You are currently viewing पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी रोजी

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी रोजी

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी रोजी

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेली, पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील इ. 5वी, 39 केद्र आणि  इ.8 वी, 29 केंद्र असे एकूण 68 परीक्षा केंद्रावर रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी  होणार  असल्याची माहिती  प्राथमिक शिक्षणाधिकारी  प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली आहे.

या परीक्षेसाठी इ. 5वी साठी 3 हजार 648 विद्यार्थी  व  इ. 8 वी साठी 2 हजार 529 विद्यार्थी प्रविष्ठ झालेले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येताना हॉलतिकीट (प्रवेशपत्र) परीक्षेच्या ठिकाणी अनिवार्य आहे. या परीक्षेचा  पहीला पेंपर सकाळी 11 ते 12.30 वाजता आणि दुसरा पेंपर दुपारी 2 ते 3.30 वाजता असे दोन सत्रात परीक्षा होणार आहे.

याबाबतची सर्व पालक, विद्यार्थी यांनी नोंद घ्यावयाची असून, कोणत्याही शंका असल्यास जवळच्या गटशिणाधिकारी कार्यायल तसेच केंद्रशाळामध्ये संपर्क  करावा.  विद्यार्थ्यांनी परीक्षेला संबंधित परीक्षा केंद्रांवर वेळेपूर्वी किमान 30 मिनीटे अगोदर उपस्थित राहावे.सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी शिक्षण विभागाच्यावतीने हार्दिक शुभेच्छा ! दिल्या आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा