*कवी शिवाजी चाळक ‘केशरमाती’ काव्य पुरस्काराने सन्मानित*
पिंपरी
ज्येष्ठ कवी इंजि. शिवाजी चाळक यांना कविराज उद्घव कानडे यांच्या स्मरणार्थ पहिल्या ‘केशरमाती’ काव्य पुरस्काराने गणेश इंटरनॅशनल स्कूल, चिखली येथे गुरुवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, ह. भ. प. नारायणमहाराज जाधव, सासवड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ – मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यवाह सुनीताराजे पवार, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, गणेश इंटरनॅशनल स्कूलचे प्रमुख एस. बी. पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातून वरिष्ठ अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ कवी शिवाजी चाळक हे सुमारे चाळीस वर्षांपासून काव्यलेखन करीत असून त्यांचे ‘अर्घ्य’ , ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ हे कवितासंग्रह तसेच ‘जंगल दंगल’ आणि ‘उंदरांचा टांगा’ हे बालकवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘नाणेघाटातील पाऊलखुणा’ या सुमारे १४० कवींच्या कवितांचा समावेश असलेल्या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे संपादन त्यांनी केले आहे. याशिवाय विविध नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सातत्याने प्रकाशित झालेल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सुमारे आठ वेळा कविता सादर करण्याची संधी त्यांना लाभली आहे; तसेच विविध साहित्य पुरस्कार आणि सन्मान यापूर्वी त्यांच्या वाट्याला आले आहेत. प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठीभाषा गौरवदिनाचे औचित्य साधून शिवाजी चाळक यांनी स्थापन केलेल्या शिवांजली साहित्यपीठ या संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय शिवांजली काव्यमहोत्सवाचे आयोजन केले जाते.
पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी ‘कॉम्रेड’ या कवितेचे सादरीकरण केले. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर साठे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

