You are currently viewing बदल

बदल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा माझी लेखणी साहित्य मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री मनिषा चिद्दरवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बदल*

 

दिवसामागून दिवस

*सरती या जीवनाचे*

रहावे सदा आनंदात

*हेच गुपीत आयुष्याचे* ….1

 

परंपरागत रिती जपूनी

*आदर्श ठेवूया घराण्याचा*

नविन सून येतील घरा

*बदल करूया विचाराचा* ….2

 

अबोल मनातील भावना

*हळूवार जपे या स्पंदनात*

गुंफूनी शब्दातील बदल

*आनंद होईल या मनात* ….3

 

समाजाचा करुनी विचार

*बदल घडवूया अज्ञानाचा*

नवीन आशा ठेवूनी मनात

*सापडेल मार्ग तव प्रवाहाचा* ….4

 

येतील जातील सगे सोयरे

*क्षणभर होईल मन चंचल*

घेवू विसावा या वळणावर

*घडेल सर्व पहा मंगल मंगल* ……5

 

मनिषा चिद्दरवार

दिग्रस

प्रतिक्रिया व्यक्त करा