You are currently viewing काजू उत्पादक शेतकरी, विकास संस्था,प्रक्रीया व्यापारी यांची ओरोस येथे सभा

काजू उत्पादक शेतकरी, विकास संस्था,प्रक्रीया व्यापारी यांची ओरोस येथे सभा

काजू उत्पादक शेतकरी, विकास संस्था, प्रक्रिया व्यापारी या सर्वांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू – मनिष दळवी

 

*जिल्ह्यातील उत्पादित काजू आपल्या जिल्ह्यातच राहीला पाहिजे*

 

सिंधूदुर्गनगरी :

काजू उत्पादक शेतकऱ्यांची काजू खरेदी करून प्रक्रिया धारकांना पुरवठा करण्याबाबत या विषयाच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवारी सभेचे आयोजन करणात आले होते. या सभेस महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद जोशी, जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे, कँश्यू मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधिक्षीका सौ.उर्मिला यादव, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ.प्रसाद देवधर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्ह्यातील विकास संस्थांचे सचिव, अध्यक्ष तसेच काजू उत्पादक शेतकरी काजू प्रक्रिया कारखानदार, काजू व्यापारी मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित होते.

जिल्ह्यातील उत्पादित झालेला काजू हा आपल्या जिल्ह्यात राहिला पाहिजे व जिल्ह्यातील कारखानदारांना तो उपलब्ध झाला पाहिजे. आपल्या काजूला एकओळख असून एक विशिष्ट दर्जा, जी आय मानांकन प्राप्त झालेला आहे हा काजू जर केरळ, बेंगलोरमध्ये गेला तर तो मिक्स करून वापरला जाईल व आपल्या काजूची ओळख जाऊ शकते. जिल्ह्यातील काजू जिल्ह्यातच राहिला तर कारखानदारांच्या मार्फत त्यावर प्रोसेस करून त्याचं ब्रॅण्डिंग करता येईल. आपल्या काजूची ओळख निर्माण झाली तर शेतकऱ्यांना २००रू.पर्यंत काजूदर आपण देऊ शकतो. शासन सर्व काही करणार हे ठरवून राहिलो तर यश मिळणार नाही या सगळ्या वाटचालीमध्ये प्रत्येक स्तरावर समस्या असतील. कुठली यंत्रणा स्वतःहून काही आपल्याला मार्ग काढून देणार नाही आपणच यातुन मार्ग काढला पाहिजे. शेतकरी, विकास संस्था, प्रक्रिया व्यापारी या सर्वांना प्रत्येक स्तरावर आर्थिक दृष्ट्या जो काही पाठिंबा लागेल तो आम्ही उभा करू. आपण असेच एक राहिला तर महाराष्ट्र शासनालाच नव्हे तर केंद्र शासनानलाही हा एक उत्तम पर्याय आपण सगळ्यांनी मिळून उभा करून देऊ शकतो. या सर्व मार्गक्रमणा मध्ये तुमची सगळ्यांची साथ, सहकार्य आणि मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करतो असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी ओरोस येथे जिल्हा बँक छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांच्या सहकार्याने विकास संस्था मार्फत काजू बी खरेदी सहकारा अंतर्गत सहकार या योजने अंतर्गत होणार असून त्यासाठी संस्थांना लागणारे अर्थसंकल्प पुरवठा करणे व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देणे व खरेदी केलेला भाव प्रक्रिया धारांना पुरवणे इत्यादी बाबीचे नियोजन करून निर्णय घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग व बाजार समितीमार्फत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजीत सभेत मनीष दळवी बोलत होते. विकास संस्था साठी आपण कर्ज देतो शेती कर्ज पिक कर्ज देतो आणि हे पीक कर्ज दिल्यानंतर त्याचा जो उत्पादित झालेला मालआहे हा उत्पादीत माल परत खरेदी करण्याची प्रक्रिया ज्या दिवशी आपण करू त्यादिवशी विकास संस्था ही खऱ्या अर्थाने त्या शेतकऱ्यांसाठी उपयोगात आली असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून आपण या सगळ्यांमध्ये विकास संस्थेची भूमिका ही निश्चित करण्या साठी आवश्यक ती मदत करायची आहे. व त्याचा उत्पादित झालेला माल खरेदी करण्यासाठी मदत करायची आहे आणि त्याच्या मालाच्या दर्जा नुसार योग्य तो मालचा भाव त्याला मिळाला पाहिजे. यासाठी आपण योग्य तो भूमिका घेतली पाहीजे.

जिल्ह्यातल्या प्रक्रिया युनिटने खरेदी करण्यासाठी लागणारे जो निधी आहे,लागणारा जो पैसा आहे हा पैसा त्या योजनेचा कार्यक्रम असतो आणि मग एकावेळी ज्यावेळी एवढ्या कोटी रुपयाचे इन्वेस्टमेंट करायची आहे.त्यामुळे तो पैसा नेमका कसा उभा करायचा यासाठी आपल्याला काही विभागणी करावी लागेल की काही पैसा कारखानदारांच्या माध्यमातून उभा राहील काही पैसा विकास संस्थांच्या माध्यमातून उभा राहील. या माध्यमातून आपण त्याला पाठींबा देऊ शकू असे मनिष दळवी यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा