You are currently viewing फूल गुलाबी

फूल गुलाबी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*फूल गुलाबी*

—————————–

 

साठी गेली उलटून तरी नयनामध्ये भाव शराबी

अजून मादक गंध वाहतो हातामधले फूल गुलाबी

 

कुठल्या शपथा, कुठली पत्रे, भेट कोणती द्यावी आता

वेणी वरती फूल माळता, जमून येतो थाट नवाबी

 

जरी कवी मी साधा आहे, ऐश्वर्याची मज साथ नसे

तुझ्या संगती माझे असणे,इथे तिथे मग दिसे रुबाबी

 

तारुण्याला कसे अडवले सारे पुसती उत्सुकतेने

सांग सखे मी कुठून राहू कुणाकुणाला किती जबाबी

 

तुजला केले धारण हृदयी खोल मनाच्या तळात आता

कबुली द्यावी प्रेमाची त्या रित भासते मला किताबी

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा