*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समुहाच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
“माझ्यातली मी” ह्या फेसबुक समूहाच्या ॲडमिन संगीता देवकर यांच्या पुढील चार काव्यपंक्तींना माझ्या शब्दात पुढे नेण्याचा उत्कृष्ट ठरलेला प्रयत्न
तुला जपतांना हल्ली दुःख, जवळपास येत नाही
कदाचित त्यांना मला देण्याइतका, वेळच उरला नाही
सगळ्यांनाच नाही जमत रे,
तुझ्यासारखं वागणं
ओठांवर जरी नसलं तरी, मनात माझ्या तुझ असणं
________________________
मुखवटा
भांडवल करण्याइतकं महत्त्व, कधीच मी दुःखाला दिलं नाही
म्हणूनच बहुतेक माझ्यात, स्वारस्य त्याला उरलं नाही
छान वाटतंय दोघातील, दुःखाचा अडसर दूर होणं
आता बस झालं कधीपासूनचं, मुखवटा घालून जगणं
अपमानित होऊनी बघत असेल, मिळेल कोठे थारा
ये होऊन आश्वस्त मजसमीप,
लागेल ना दुःख-वारा
मुक्त होऊ साऱ्या पाशातून, तोडूनी सारी बंधनं
हृदयांतरी ऐकुया निःश्वासांची,
एकरूप स्पंदनं
नको नको अनमान आता, घालते घनव्याकुळ साद
मीच मीरा, मीच राधिका, देशील ना रे
प्रतिसाद?
ये सामोरी पुरे जाहला लपाछपीचा, खेळ आता खेळणं
जन्म जन्मांतरीचे नाते अपुले, अपुल्याच हाती जपणं
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. आपल्याला ही कविता आवडल्यास लाईक करून नावासह शेअर करायला काही हरकत नाही.
________________________