*प्रवासा दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बलभीम ननवरे यांची समय सूचकता व चिकित्सक वृत्ती मुळे अल्पवयीन मुलीचा अपहरणकर्तेच्या ताब्यातून सुटका या घटनेवर त्यांचे प्रेरणादायी मनोगत*
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
दिनांक 08/02/2024 रोजी मी मा. पोलीस उप आयुक्त साहेब यांचे परवानगीने कोर्ट साक्ष कामी जिल्हा सत्र न्यायालय शिवाजीनगर कोर्ट, पुणे येथे सिंहगड एक्सप्रेस ने जात असताना ट्रेन मध्ये एक 30 वर्षीय व्यक्ती एका 8 वर्षाच्या मुलीला घेऊन प्रवास करीत होता. प्रवासा दरम्यान ते एकत्रित डब्ब्यात होते सदर व्यक्ती त्या मुलीला तिने न मागताही toys नि खाऊ घेऊन देत होता. त्यामुळे मुलगीही त्याच्या सोबत खुशीने प्रवास करीत असल्याचे दिसत होते. परंतु मुलगी मराठी बोलत होती आणि सदर व्यक्ती हिंदीतून बोलत होती. माझ्या seat जवळच उभी असल्याने मी तिला बसायला माझ्या शेजारी जागा देऊन मुलीला आईविषयी विचारणार केली असता आई घरी असल्याचे सांगितले. मी सदर व्यक्ती तिचा बाप असावा असे समजून तिला बोलत होतो. पण व्यक्ती हिंदी भाषिक असल्याने मी सदर व्यक्तीला मुलगी तुमची कोण आहे अशी विचारणा केली असता त्याने माझीच मुलगी असल्याचे सांगितले परंतु त्याच वेळी मुलीचा चेहरा सदर व्यक्ती तिचा बाप नसल्याचे सांगत होता. मी मुलीकडे गप्पा मारत असताना सदर व्यक्ती मुलीला डोळे वाटरून माहिती देण्यापासून रोखत असल्याचे माझ्या लक्षात आल्याने मी मुलीला तिच्या आई चा मोबाईल क्रमांक मागितला. त्यावेळी सदर व्यक्ती पुन्हा तिला खुणावत असल्याचे दिसले. विनाकारण आपण चौकशी करत असल्याने बापाला आवडत नसावे म्हणून मी पुन्हा माझ्या मोबाईल मध्ये बघत बसलो त्यावेळी माझ्या मोबाईल मध्ये माझा युनिफॉर्म वरचा फोटो पाहून मुलीने आश्चर्याने मला विचारले की तुम्ही पोलीस आहात त्यावेळी मी हो म्ह्णून मान हलवली. मुलीच्या आई ला मुली सोबत बोलणं करून द्यावं आणि नवरा बायकोच जमत नसावे आणि बाप मुलीला घेऊन जात आहे याचं कारण शोधण्यासाठी मी तिला तिच्या आईचा मोबाईल क्रमांक मागितला असता तिने मामाचा मोबाईल क्रमांक संगीतला. त्यावेळी ती व्यक्ती मुलीला घेऊन जाण्यास निघाली तेंव्हा मी त्यास पुन्हा नाते विचारले असता त्याने माझी बहीण असल्याचे सांगितले. मग लागलीच त्याला पकडून खाली बसवले व मुलीच्या मामाला कॉल करून विचारपूस केली असता काही वेळातच मुलीच्या आई वडिलांचा कॉल आला आणि मुलगी घरातून शाळेला गेलेली परत आली नसल्याचे समजले त्यावेळी त्यांना माझी ओळख करून देऊन मुलगी सुखरूप असून मुलगी सुरक्षित पुणे लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द करू असे सांगून मुलीचे आई वडिलांना वालीव पोलीस ठाणे, मीरा – भाईंदर, वसई – विरार येथे गुन्हा दाखल करण्यास सांगितले. लोहमार्ग पोलीस ठाणे येथे ट्रेन मधील नागरिकांच्या मदतीने (लोणावळा पासून लोहमार्ग चा एक अंमलदार मदतीला लोहामार्ग नियंत्रण कक्षाकडून मिळाला ) मुलगी व आरोपीला पुणे स्टेशन येथे लोहमार्ग पोलिसांचे ताब्यात सुखरूप दिले आहे. मुलीचा मामा सचिन शेलार यास पुणे स्टेशन येथे आम्ही स्वतः बोलावून घेतले होते.
वालीव पोलीस ठाणे गु र नं 79/2024, कलम 363 भा द वि नुसार दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव :- दयानंदकुमार शर्मा, वय अंदाजे 30 वर्षे, रा – मूळ बिहार
वरिल बातमी साठी बलभीम ननवरे, सहा पोलीस निरीक्षक, सपो नायगाव, प्रतिनियुक्ती इलेक्शन सेल/अभियान, ब्रहनमुंबई यांच्या सहकार्याने.
संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*