You are currently viewing स्मृति भाग ४६

स्मृति भाग ४६

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ४६*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आज आपण *शङ्खस्मृतितील आठवा अध्याय ” नित्यनैमित्तिकादिस्नानानाम् “* नावाचा अध्याय पाहू . तत्पूर्वी थोडेसे वेगळे .

माझे आयुर्वेदाचे शिक्षण रा. तो. आयुर्वेद महाविद्यालयात झाले . सन १९८० — १९८५ . दरम्यान ८२—८३कडे अंदाजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जगन्नाथराव जोशी यांचे व्याख्यानास सगळी कामे उरकून अट्टाहासाने गेल्याचे आठवते . त्यात त्यांचे एक वाक्य स्मरणात आहे , ” जन्माला येणारं गाढवाचं पिल्लू फार गोंडस असतं ! पण ते मोठं झाल्यावर आपला आदर्श बनतं !! ” हशा तर पिकला ! पण ५०% च !! असा हा साधा विनोदही न कळणारी ————! भारतात असतील तर ते ऋषिसंस्कृतिवर शंका घेणं साहजिक आहे ! पण दुसरे असे की आम्ही त्यांना समजावून सांगू शकलो नाही , याचं दुःखही नाही आम्हाला ?? हे भारताचं दुर्दैव आहे .

आमचा भारत देश . हिमालयापासून हिन्द महासागरापर्यंत त्याची सीमा ! दक्षिण धृवापर्यंत समजली जावी तशी ! पण स्वहितैषी केन्द्रित लोकांचे हातात राजकारण गेल्यावर जनता काय करेल ? ती ही स्वहितकेन्द्रितच झाली व घात झाला !

सगळे भिक्षुकी करणारे ब्राह्मण लग्न लावतांना एक मंगलाष्टक म्हणतात . *” गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा “~ ~ ~ यात बर्‍याच नद्यांची नावे आहेत . याची आज आठवण येण्याचे कारण आज स्नानाविषयी चर्चा आहे म्हणून !! कारण आमच्या ऋषिंनी हा श्लोक स्नान करतांना रोज म्हणायला सांगितलाय !! तो का ? ते आज सांगतो . त्यातील काही नद्या हिमालयातून उगम पावतात . या श्लोकात भारतातील सर्वच प्रान्तातील नद्यांची नावे येतात ! *या श्लोकाचा अर्थ — गंगा , सिंधु , सरस्वती ( पाकिस्तान , अफगाण ) यमुना , गोदावरी , नर्मदा , कावेरी , शरयू , महेन्द्रतनया , चर्मण्वती वेदिका , क्षिप्रा , वेत्रवती , महासुरनदी (तिबेट ) , ख्याता जया , गण्डकी ( नेपाळस्थित ) , पूर्णा ह्या नद्यांचे व हिमालयातून निघणार्‍या इतर नद्यांचे उगमापासून निवेशापर्यंतचे त्यांचे सिंचनाने जेवढी जमीन अन्न देते ते प्रदेश हे आमचे आहेत* ही जाणीव देणारा हा श्लोक आहे !!!!!!!! पण दुर्दैव भारताचे !!! हा इतिहास चारही वर्ण विसरले कारण एक ही माणूस आज अंघोळ करतांना हा श्लोक म्हणणेच विसरला !!!

पण यापुढे आपण सार्‍यांनी हा श्लोक स्नानाचे वेळी म्हणावा व एकात्मतेची भावना व आमच्या सीमांची माहितीची जाणीव जपावी , ही सर्वांना प्रार्थना करतो .🙏🙏

हा श्लोक श्रद्धेने म्हणावा , जपावा ! कारण श्रद्धा नसेल तर माणूस पशू होतो . आम्ही भारतीय पशू नाही ना ? चला सारे मिळून असणारे पशुत्व हनन करुन यज्ञशिखांचे तेज पिवून पुन्हा दिव्य भव्य भारत , श्रद्धावान भारत निर्माण करु या .

अहो आम्ही शंकाही अशा घेतो अभ्यास न करता ! की 🌹 चंद्र केवळ इतका जवळ असून त्याचा *वन लुनार डे=14 earth days होतात* तर पृथ्वीवरील लक्षावधी वर्षे व ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र ह्यांचे माझ्या पूर्वजांनी म्हणजे ऋषिंनी सांगितलेल्या गणितावर शंका घेणारे किती हरामखोर असावेत ? अहो , बौद्ध विचारांचा उगम जिथून झाला तो नेपाळ हिंदू राष्ट्र ! आणि आमचे राजकारणी बौद्धांना हिंदूविरोधी म्हणून चिथवतात !! . शेवट आम्ही एक नाही हेच आमचं दुर्दैव !!

ऋषिंनी स्नानाचे सहा प्रकार सांगितले ते उद्या पाहू .

आज थांबतो . विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =