You are currently viewing तडजोड

तडजोड

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री डॉ. दक्षा पंडित लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तडजोड*

 

जगण्यासाठी चाले

साऱ्यांचीच धडपड

तत्व,मुल्यांना तूडवुनी

करू नये तडजोड…..१

 

संसारात तडजोड

नित्य करावी लागते

चक्र संसार रथाचे

बळकट होत जाते….२

 

अन्यायाशी तडजोड

आहे फार मोठे पाप

अश्या वागण्याने मग

पुढे होईल अनुताप….३

 

जीवनाच्या प्रवासात

येती अनेक व्यत्यय

मार्ग दिसे तडजोडीचा

ह्याचा वेळोवेळी प्रत्यय…४

 

वृद्धापकाळी ठेवाव्या

कमीतकमी अपेक्षा

तडजोड करूनिया

होणार नाही उपेक्षा….५

 

झुकते माप घेण्यासाठी

करू नये सदा धडपड

नेहमी अश्या वागण्याने

होईल तुमची परवड…६

 

 

डॉ दक्षा पंडित

दादर,मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा